दौंडकरांनी नियमांचे पालन केल्यामुळे पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या घटली,232 पैकी फक्त 50 पॉझिटिव्ह,दौंड करांचे आभार डॉ संग्राम डांगे


दौंडकरांनी नियमांचे पालन केल्यामुळे पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या घटली,232 पैकी फक्त 50 पॉझिटिव्ह,दौंड करांचे आभार डॉ संग्राम डांगे

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी ;

दौंड तालुक्या सह शहरातील पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे आणि ही दौंडकर जनते साठी आनंदाची बातमी आहे, आणि हे सर्व घडले आहे जनतेने शासनाच्या नियमांचे पालन केल्यामुळे च असे मत डॉक्टर संग्राम डांगे यांनी व्यक्त केले आहेत, त्यांच्या मातोश्रींचे निधन झालेले असतानाही ते येथील डॉक्टरांच्या संपर्कात राहून माहिती घेत आहेत, आज 232 जणांची अँटी जेण तपासणी करण्यात आली होती त्यापैकी फक्त 50 व्यक्ती पॉझिटिव आल्याचे डॉक्टर संग्राम डांगे यांनी सांगितले आहे,त्यामुळे डॉक्टर संग्राम डांगे यांनी दौंडकर यांचे आभार मानले आहेत, आमच्या सर्व स्टाफ आपल्या सेवेत 24तास हजर आहोत परंतु तुमचे सहकार्य अपेक्षित आहे त्यासाठी सर्व जनतेने असेच सहकार्य ठेवून कोरोना वर मात करण्यासाठी प्रयत्न करूया, सर्वांनी असेच शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून या महामारी ला हरवू शकतो असे ही यावेळी ते म्हणाले,

काही ठराविक गावातीलच रुग्णसंख्या वाढत आहे हॉटस्पॉट वर असलेल्या गावांनी अजून थोडं काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे,पॉझिटिव आलेल्या रुग्णांना विलगीकरण ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवणे तसेच गरज असल्यास त्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र करणे आणि गाव बंदी करून बाहेर येणाऱ्या किंवा गावातील बाहेर जाणारांना थांबवणे गरजेचे आहे, हे सर्व तेथील हॉटस्पॉट असलेल्या ग्रामपंचायतीने लागू करून लोकांची सुरक्षितता पाहायचे आहे तसे न झाल्यास किंवा कोणी ऐकत नसल्यास दौंड पोलीस स्टेशनला कळवा अशा सूचना दौंड पोलिस स्टेशनचे प्रोबेशनरी अधिकारी मयूर भुजबळ यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News