महिलांच्या आरोग्य गरजांना सर्वाधिक प्राधान्य देण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


महिलांच्या आरोग्य गरजांना सर्वाधिक प्राधान्य देण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

संयुक्त राष्ट्राने निर्धारित केलेले शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी माता मृत्यू प्रमाण अधिक वेगाने कमी करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

29 वा युधवीर स्मृती पुरस्कार डॉ. एविटा फर्नांडिस यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रदान

देशातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास 50 टक्के लोकसंख्या ही महिलांची आहेमहिलांच्या आरोग्याच्या गरजांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन आज  उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी केले.

हैदराबाद येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. एविटा फर्नांडिस यांनात्यांनी महिलांच्या आरोग्याची काळजी आणि त्याच्या सबलीकरणासाठी केलेल्या कार्याबद्दल,आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून "युधवीर स्मृती पुरस्कारप्रदान करण्यात आला.

निरोगी समाजाचा मूलभूत आधार म्हणून स्त्रियांच्या आरोग्याच्या गरजा भागविण्यासाठी विविध आरोग्य सेवांनी  लक्ष केंद्रित केले पाहिजे असे ते म्हणाले.

देशातील माता मृत्यू प्रमाण कमी करण्यात लक्षणीय प्रगती झाली आहे यावर लक्ष वेधतउपराष्ट्रपतींनी संयुक्त राष्ट्रांनी निर्धारित केलेल्या शाश्वत विकासाचे  (एसडीजी)  3.1 हे ध्येय साध्य करण्यासाठी हे प्रमाण अजून कमी करण्यावर भर दिला पाहिजे असे नमूद केले. 2030 पर्यंत जगातील माता मृत्यू प्रमाण 100,000 ला 70 पेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.

महिलांचे आरोग्य आणि प्रजनन कार्यातील महत्वपूर्ण  कार्याबद्दल डॉ. एविटा फर्नांडिस यांची प्रशंसा करताना उपराष्ट्रपतींनी त्यांचा महिला सक्षमीकरण आणि सामान्य प्रसूती करणाऱ्या म्हणून गौरव केला.

सार्वजनिक रुग्णालयांमधील सिझेरियन प्रसूती कमी करण्यासाठी आणि सामान्य/नैसर्गिक पद्धतीने प्रसूती वाढविण्यासाठी तेलंगणा सरकार आणि फर्नांडिस रुग्णालयाने  युनिसेफसह केलेल्या प्रयत्नांचा संदर्भ देताना उपराष्ट्रपतींनी याचे वर्णन प्रशंसनीय उद्दीष्ट म्हणून केले आणि सिझेरियन कमी करण्यासाठी खासगी रुग्णालयांनी देखील या अभियानात सामील व्हावे अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नायडू म्हणाले की मातृ आरोग्य सेवा सुधारणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि प्रसविकांचा राष्ट्रीय संवर्ग तयार करण्यासाठी डॉ. एविटा यांच्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले.

उपराष्ट्रपतींनी दिवंगत  युधवीरजी यांनाही यावेळी श्रद्धांजली वाहिली.  युधवीरजी हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते ते - स्वातंत्र्यसैनिकसमाजसेवक आणि प्रतिष्ठित पत्रकार देखील होते असे राष्ट्रपती म्हणाले. युधवीरजींनी मिलाप डेली प्रथम उर्दूमध्ये आणि नंतर हिंदी भाषेत 1950 मध्ये सुरु केले.

ते म्हणाले कीहिंदी मिलाप हे नैतिक आणि नि:पक्षपाती बातम्या देणारी संस्था म्हणून विकसित झाले आहे. हैदराबाद आणि दक्षिण भारतातील हिंदी भाषिक वाचकांच्या जीवनातील हा अविभाज्य भाग झाला आहे. युधवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर गुप्ताफर्नांडीस प्रतिष्ठानच्या अध्यक्ष  डॉ. एविटा फर्नांडिस आणि इतर मान्यवर आभासी पद्धतीने या सोहळ्यात सहभागी झाले होते.

उपराष्ट्रपतींच्या भाषणाचा संपूर्ण मजकुरासाठी येथे क्लिक करा.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News