होमिओपॅथी उपचार पध्दती कोरोनावर संजीवनी -डॉ. प्रमोद लंके


होमिओपॅथी उपचार पध्दती कोरोनावर संजीवनी -डॉ. प्रमोद लंके

ना ऑक्सिजन, ना रेमडेसिविर तरीही दिडशेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण होमिओपॅथी उपचाराने बरे...सर्वसामान्यांसाठी परवडणारी व गुणकारी उपचार पध्दती..ऑक्सिजनवर गेलेला रुग्ण देखील झाला ठणठणीत

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- कोरोनामुळे सर्वच हॉस्पिटल गच्च भरले असताना, अनेक रुग्णांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी तर ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनसाठी पळापळ करताना दिसत आहे. मात्र कोरोना रुग्णांवर होमिओपॅथी उपचार पध्दती संजीवनी ठरत आहे. शहरातील दिडशेपेक्षा जास्त कोरोना रुग्णांसह परिस्थिती खालावलेल्या ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांना देखील होमिओपॅथीच्या औषधाने बरे केले असल्याची माहिती होमिओपॅथी तज्ञ डॉ. प्रमोद लंके यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढले आहे. अनेक रुग्ण दगावत असताना सर्वसामान्यांमध्ये या आजाराची मोठी दहशत निर्माण झाली आहे. तर हॉस्पिटलचे लाखोच्या घरात येणारे बिल पाहून सर्वसामान्यांना कोरोनाच्या उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलची पायरी चढणे देखील अवघड बनले आहे. सर्वसामान्यांसाठी परवडेल व गुणकारी होमिओपॅथी उपचार पध्दती कोरोनावर प्रभावी असल्याचे डॉ. लंके यांनी मोठ्या संख्येने रुग्ण बरे करुन सिध्द केली आहे. कुठल्याही विषाणूजन्य आजारात ताप येणे हे त्याचे सर्वसामान्य लक्षणे असते. परंतु बहुतांश लोकांना ताप आल्यास ते घाबरून जातात व ताप घालवण्यासाठी वेगवेगळे उपचार करतात. जो ताप रुग्णांचे रक्षण करण्यासाठी शरीराने आणलेला आहे. तो ताप त्या विषाणूला रुग्णांमध्ये अति संक्रमण करू देत नाही. म्हणून पहिल्या टप्प्यात बहुतांशी रुग्णांमध्ये ताप गेला की, रुग्णाला निमोनिया होण्याची भीती वाढते. ही प्रक्रिया सर्वच रुग्णांमध्ये होते असे नाही. यातील वेगवेगळ्या रुग्णांचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. होमिओपॅथी औषध अचूक निवडल्यावर रुग्णांचा असणारा ताप एका उच्च बिंदूपर्यंत वाढून तो नाहीसा होतो व रुग्ण या आजारातून बरा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

शहरातील कोरोनाने बाधित झालेले संपुर्ण कुटुंब होमिओपॅथी औषधाने बरे झाले आहेत. त्यापैकी एकाची गंभीर परिस्थिती निर्माण होऊन निमोनिया झालेला रुग्ण पंधरा दिवसांनी विना ऑक्सिजनने बरा झाला. हा गंभीर रुग्ण चांगला झाल्याने त्या कुटुंबीयांचा होमिओपॅथी उपचारावर मोठा विश्‍वास बसला. त्यांच्या पुण्यातील मावशीचा एचआरसिटीचा बारा स्कोर असतानादेखील डॉक्टरांच्या सल्ल्याने होमिओपॅथी उपचार करून घेतले. त्या रुग्णाचा एचआरसिटी स्कोर अवघ्या सात दिवसात पाच वर आला आहे. आनखी एक पुण्यात आयसीसूमध्ये ऑक्सिजनवर गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाची प्रकृती सुधारली आहे. नगर जिल्ह्यातील खेडे गावातील काही रुग्ण बरे झाल्याने ग्रामीण भागातून उपचारासाठी संपर्क साधला जात आहे. नगर शहरासह केडगाव, चिखली, भोरवाडी, चास, घोसपुरी, कामरगाव, पारनेर इतरही बरेच गावातील कोरोना रुग्ण बरे झाले असून, इतर रुग्णांवर उपचार सुरु आहे. अशाच पध्दतीने अनेक रुग्ण कमी खर्चात ठणठणीत होत असल्याने होमिओपॅथी उपचार पध्दतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असून, अनेक रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांना होमिओपॅथी उपचार पध्दती आधार व प्रभावी ठरत असल्याची माहिती डॉ. लंके यांनी दिली. 


अहमदनगर व केडगाव येथे मागील 21 वर्षापासून होमिओपॅथी उपचार सेवा सुरु आहे. होमिओपॅथीने अनेक दुर्धर व गंभीर आजार नीट झाले आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार देताना या आजाराची लक्षणे व विविध प्रकारच्या रुग्णांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला.  होमिओपॅथी औषध कोरोना रुग्णांच्या सर्व लक्षणांचा आढावा घेऊन प्रत्येक व्यक्तीचे वेगळे औषध निवडले जाते. ते औषध रुग्णास दिल्यानंतर रोग प्रतिकारक्षमतेला बळकटी मिळते व तीच संरक्षक प्रणाली या कोरोनाविषाणू विरुद्ध लढा देण्यासाठी उपयोगी ठरते. तर रुग्ण स्वतः कोरोनावर मात करून यशस्वी बरा होतो. होमिओपॅथी उपचार पध्दतीत रुग्णांची शारीरिक, मागील आजार व भावनिक लक्षणांचा विचार करुन अचूक औषधे निवडले जातात. याच कारणामुळे रुग्ण अतिशय सहज व जलद गतीने बरे होत आहे. -डॉ. प्रमोद लंके (होमिओपॅथी तज्ञ)कोरोना बाधित असलेल्या प्रत्येक रुग्णांना खूप थकवा येत असतो. अशा वेळेस त्यांना भरपूर प्रमाणात पाणी, सकस आहार घेणे आवश्यक आहे. तसेच  शरीराला आरामची गरज असते. आजारपणात श्रम केल्यास प्रतिकारशक्ती कमी होऊन हा आजार वाढण्याची भीती आहे.


आमच्या संपुर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार केला असता, तर दहा लाखाच्या घरात बिल गेले असते. शिवाय हॉस्पिटलमध्ये बेड देखील शिल्लक नव्हते व जिवाला मोठा धोका होता. मात्र डॉ. लंके यांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथी उपचार पध्दती घेऊन सर्वच कुटुंबातील सदस्य बरे झाले आहेत. घरातील निमोनिया झालेला ज्येष्ठ व्यक्ती देखील ठणठणीत बरा झला आहे. कोरोना झालेल्या नातेवाईकांना देखील ही उपचार पध्दती अवलंब करण्याचे सांगितले आहे. इतर रुग्णांनी देखील या उपचार पध्दतीवर विश्‍वास ठेऊन उपचार घेतल्यास चांगले परिणाम मिळणार आहे. -प्रदिप मनोहर झरेकर (नगर) 

अधिक माहितीसाठी 9890068999 डॉ. प्रमोद लंके (होमिओपॅथी तज्ञ)

जाहिरात
Search
विडिओ
Recent News