राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कर्जतच्या कोव्हिड सेंटरला दोन टन जीवनावश्यक वस्तूंची मदत


राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कर्जतच्या कोव्हिड सेंटरला दोन टन जीवनावश्यक वस्तूंची मदत

आ.रोहित पवारांच्या आवाहनास प्रतिसाद प्रशासनानेही मानले आभार 

कर्जत प्रतिनिधी ( मोतीराम शिंदे ) - कर्जत येथील कोव्हिड सेंटरला राष्ट्रवादी  काँग्रेस व रोहितदादा पवार युवा मंचच्या वतीने सुमारे दोन टन धान्याची नुकतीच मदत करण्यात आली. कर्जत प्रशासनाच्या उपस्थितीत हे धान्य व जिवनावस्यक वस्तूं सुपूर्द करण्यात आले. यामध्ये सर्वप्रकारच्या डाळी,तेल आदींच्या सामावेश आहे. आ.रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व रोहितदादा पवार युवा मंचच्या हस्ते हे धान्य प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत केलेल्या या मदतीमुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.धान्याचा लाभ कोव्हिड केअरमध्ये उपचार घेणाऱ्या सुमारे आठशे रुग्णांना होणार आहे.वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येला वैद्यकीय सेवांबरोबरच जीवनावश्यक बाबी पुरवण्यात प्रशासनाला कसरत करावी लागते. आ.रोहित पवार यांनीही अनेक सुविधा पुरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे मात्र अनेकांकडून अशी मदत झाली तर प्रशासनाचा ताणही कमी होणार आहे.


      यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे,माजी उपसभापती नानासाहेब निकत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल शेलार, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा मनीषा सोनमाळी, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष प्रा. विशाल म्हेत्रे, भास्कर भैलुमे, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष सचिन मांडगे, राहुल नवले, संदीप गावडे, आशिष काळदाते आदी उपस्थित होते.

ज्या-ज्या वेळी संकटकालीन परिस्थिती निर्माण होईल अशा वेळी आ. रोहित पवारांनी दिलेल्या आवाहनास प्रतिसाद देत राष्ट्रवादीचे पदाधिकारी-कार्यकर्ते सरसावतात.सर्वसामान्य नागरिक मदतीपासून वंचित राहिला नाही पाहिजे हीच रोहितदादा पवार यांच्या विचाराची चळवळ आम्ही मदतकार्यातून अशीच पुढे नेऊ

सुनिल शेलार - शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News