आदर्श माता चातुराबई डांगे यांचे निधन,डॉ संग्राम डांगे यांना मातृ शोक


आदर्श माता चातुराबई डांगे यांचे निधन,डॉ संग्राम डांगे यांना मातृ शोक

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांच्या मातोश्री यांचे पहाटे चार वाजता दुःखद निधन झाले आहे,यांच्या मातोश्री गेल्या दहा दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या होत्या,त्यांचे नांदेड येथे घर असून आई आजारी असताना देखील डॉ संग्राम डांगे यांनी दौंड च्या जनतेची सेवाच केली,माझी आई वडील खेडेगावातील असून त्यांनी मला शिक्षण देऊन इथपर्यंत पोहचवले असल्याचे त्यांनी एकदा चर्चा करताना सांगीतले होते,माझी आई खरोखरच एक आदर्श माता असल्याचे त्यांनी सांगितले होते,

 मातोश्री स्व. चतुराबाई डांगे यांचे आज दि. 28 एप्रिल रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.... एक आदर्श मातोश्री आज आपण गमावली... ईश्वर त्यांच्या मृत आत्म्यास शांती देवो व डांगे परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो ही नम्र प्रार्थना,महाराष्ट्र भुमी मराठी न्यूज चॅनलची सर्व टीम त्यांच्या दुखात सहभागी आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News