पवित्र रमजान महिन्यात कडक रोजा असताना सामाजिक कार्यकर्ते श्री. समीर शेख यांनी केले हिंदु महिलेवर अंत्यसंस्कार


पवित्र रमजान महिन्यात कडक रोजा असताना सामाजिक कार्यकर्ते श्री.  समीर शेख यांनी केले हिंदु महिलेवर  अंत्यसंस्कार

शेवगाव प्रतिनिधी सज्जा पठाण: शेवगांव शहरातील अनोखी घटना कोरोना कोव्हीड च्या काळात इथे आपल्या घरचे आपल्याला कोरोना  आजार झाल्यावर विचारात नाहीत तेथे माणुसकीचे अनोखे दर्शन घडविणारी घटना शेवगांव शहरात घडली दोन दिवसांपूर्वी शहरातील आधार हॉस्पिटल मध्ये शिक्षक  दाम्पत्य असलेल्या परिवारातील वृद्ध आजींचा कोरोनाने मृत्यू झाला त्यावेळी त्यांचा मुलगा आणि सुन  दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याने व त्यांच्यावर उपचार सुरु असल्याने व जवळच्या नातेवाईकांनी कोरोना च्या भीतीने पाठ फिरवल्याने त्या वृद्ध महिलेचा अंत्यविधी कोणी करायचा हा प्रश्न उभा राहीला  त्यांची सतरा वर्षांची नातं  एकटी धावपळ करताना सामाजिक कार्यकर्ते समीरभाई शेख यांनी पहिले आणि कुठलाही विचार न करता मृत महिलेचे सर्व अंत्यसंस्कार विधी  अग्नी देणे राख सावडने आदी कर्म आपल्याला कडक रोजाचे  उपवास असताना सुध्दा पार पाडले सामाजिक जाणीवेतून अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला आधार दिला याचा कुठलाही गाजा वाजा न करता हिंदु मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले स्व.मारूरतराव घुले पाटील कोव्हीड सेंटर वर ही  ते निरपेक्ष हेतुने मदत करत असतात या कार्याबद्दल  राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार चंद्रशेखर घुले पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले आणि ज्ञानेश्वर कारखान्याचे  चेअरमन श्री. नरेंद्र पाटील यांनी समीर भाईंचं अभिनंदन केलं 

*ताजा कलम*

*या कठीण काळात एक मेकांचे दुःख  वाटुन घेणे आणि जात धर्म पंथ सर्व विसरून मानवता हा एकच  धर्म आहे हे दाखवुन देण्याची वेळ आली आहे अश्या हजारो समीर शेख ची महाराष्ट्राला गरज आहे*

जाहिरात
Search
विडिओ
Recent News