पाटस | माय लेकराला फाशी देऊन मारले, यवत पोलिसांनी आत्महत्येचा बनाव केला उघड,पतीला अटक


पाटस | माय लेकराला फाशी देऊन मारले, यवत पोलिसांनी आत्महत्येचा बनाव केला उघड,पतीला अटक

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

 कोरोना म्हामारिने जनता त्रस्त झाली असताना पाटस मध्ये दुर्दैवी घटना घडली आहे,दौंड तालुक्यातील पाटस येथे एका सात वर्षाच्या मुलासह आईने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची खबर पाटस पोलीस स्टेशन येथे मिळाली होती त्यानुसार  पोलिसांनी पाहणी केली असता,वेगळा संशय आला त्या दिशेने तपास केला असता

त्या महिलेच्या पतीने चारित्र्याचा संशय वरुन प्रियशीच्या मदतीने आपल्या सात वर्षांच्या मुलाची आणि पत्नीचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती यवत चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.                      याप्रकरणी पती सचिन दिलीप सोनवणे (रा.पाटस ता.दौंड,जि.पुणे) यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे,      

        लिना सचिन सोनवणे (वय 35 ) कुमार ओम सचिन सोनवणे (वय 7, दोघेही स्वराज व्हॅली अपार्टमेंट रा. पाटस ता.दौंड जि.पुणे ) या दोघांचा मृतदेह मंगळवारी ( दि. 27 ) गळफास घेतलेल्या स्थीतीत मुलगी वैष्णवी हिने पाहिले होते,  मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता, यवत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता ही आत्महत्या नसून खून असल्याचे निष्पन्न झाले आहे, सचिन सोनवणे याने प्रियशीच्या मदतीने पत्नी लिना हिचा खून केला हे मुलगा ओम आणि वैष्णवी हिने पाहिले होते, मात्र मुलगा हे सगळ्यांना सांगणार भीतीने नराधम बापाने मुलगा ओम याचा ही खुन करून मृतदेह आत्महत्या केेल्याचा बनाव करीत गळफास घेतलेल्या स्थीतीत लटकवला, मुलगी वैष्णवी हीने हा प्रकार कोणाला सांगणार नाही अशी म्हणाली म्हणून ती वाचली, मात्र पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सदर घटना संशयास्पद वाटली पोलिसांनी सखोल चौकशी करीत मुलगी वैष्णवी हीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितल्याने आत्महत्या प्रकरणाचा उलगडा झाला,आणि 8 तासाच्या आत  पोलिसांनी सचिन दिलीप सोनवणे याला ताब्यात घेतले आहे पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News