पळशीत हनुमान जयंती साधेपणाने साजरी 1


पळशीत हनुमान जयंती साधेपणाने साजरी 1

बारामती : प्रतिनिधी  (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील पळशी याठिकाणी श्री हनुमान मंदिरामध्ये यात्रा कमेटीतील मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत शेकडो वर्षाच्या परंपरेप्रमाणे श्री हनुमान जन्मोत्सव गर्दी न करता साजरा करण्यात आला.

  कोरोना प्रादुर्भाव वाढू नये व प्रशासनाच्या सूचनांचा आदर करीत यात्रा कमिटीचे सदस्य, काही ग्रामस्थ व पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुर्योदयासमयी यावर्षी हा उत्सव साजरा करण्यात आला. परंतु हनुमान जयंती कार्यक्रमानंतर असणारी यात्रा रद्द करण्यात आल्याचे यात्रा कमिटी व सरपंच बाबासाहेब चोरमले यांनी याआधीच जाहीर केले आहे. त्यामुळे यात्रा काळात ग्रामस्थांनी या मंदिर परिसरात गर्दी करू नये अशा सूचनाही दिल्या आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News