शहरांमध्ये फिरते अन्नछत्रालय उपक्रमास अहमदनगर होलसेल व्यापारी कापड व गारमेंट असोसिएशनच्या वतीने मदत.


शहरांमध्ये फिरते अन्नछत्रालय उपक्रमास अहमदनगर होलसेल व्यापारी कापड व गारमेंट असोसिएशनच्या वतीने मदत.

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) -  लॉकडाऊन मध्ये रुग्णांइतकीच मदत हातावर पोट असलेल्या गरजूंनाही करणे आवश्यक आहे अनेकांचे रोजगार ठप्प झाल्याने अनेकां समोर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी नगर शहरातील शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन व श्री महावीर प्रतिष्ठान व आय लव नगर  संचलित फिरते अन्नछत्रालय सुरू करून अत्यल्प दरात सकस पौष्टिक जेवण देण्याचा उपक्रम चालू केले आहे ही खरी मानवसेवा आहे. या कार्यात योगदान देताना मोठा आनंद होत आहे असे प्रतिपादन विजय पितळे यांनी केले.

गरजूंना अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व श्री महावीर प्रतिष्ठान व आय लव नगर यांच्या संयुक्त पुढाकारातून भगवान महावीर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अहमदनगर येथे फिरते अन्नछत्रालय सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी अहमदनगर होलसेल व्यापारी कापड व गारमेंट्स असोसिएशनच्या वतीने १५ हजारांची देणगी महावीर प्रतिष्ठान ट्रस्ट चे अध्यक्ष हर्षल बोरा व उपाध्यक्ष चेतन भंडारी यांच्याकडे धनादेश देण्यात आला यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी विजय पितळे, निखील गांधी, घनश्याम आहुजा, दीपक कासवा, आनंद कटारिया, सागर काबरा, सतिश कुलकर्णी, राकेश भंडारी आदी उपस्थित होते.असोसिएशनचे निखिल गांधी म्हणाले की उद्योजक नरेंद्र फिरोदिया कायम सामाजिक बांधिलकी जपत असतात व कोरोनाच्या महामारीत अनेकांसाठी त्यांची मदत लाखमोलाची ठरत आहे. महावीर प्रतिष्ठानही या कार्यात नेहमी सक्रिय आहे. अशा कार्याला भविष्यातही मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News