रुग्णांचे प्राण वाचविण्यात लोढा बंधूंची महत्वपूर्ण भुमिका - अल्तमश जरीवाला


रुग्णांचे प्राण वाचविण्यात लोढा बंधूंची महत्वपूर्ण भुमिका - अल्तमश जरीवाला

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्यावतीने अहमदनगर इंडस्ट्रियल गॅसेस प्रा.लि.चे संचालक रमेश लोढा व विलास लोढा यांचा राजूभाई जहागिरदार यांच्या हस्ते सत्कार करुन आभार मानण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अलतमश जरीवाला, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोसिम शेख, सामाजिक कार्यकर्ते साहिल सय्यद आदि. 

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - आज कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने सर्वत्र हाहकार माजला आहे. सरकारी हॉस्पिटलसह सर्वच खाजगी हॉस्पिटल फुल झाले आहेत. याही परिस्थितीत प्रशासन आणि सामाजिक संस्था आपआपल्यापरी रुग्णांना दिलासा देण्याचे काम करत आहेत. परंतु आज अनेक रुग्णांना रेमडिसिवर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. यातील ऑक्सिजनची कमतरता अहमदनगर इंडस्ट्रियल गॅसेस प्रा.लि.च्या माध्यमातून लोढा बंधू दूर करुन रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी महत्वपूर्ण भुमिका बजावत आहेत. त्यांचे हे कार्य प्राणवायू दूतासारखेच आहे. रात्रं-दिवस ते आपल्या टिमसह रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात व्यस्त असून, येणार्‍या प्रत्येकाला लवकरात लवकर ऑक्सिजन कसा मिळेल, यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रशासन, हॉस्पिटलचे कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्या आशा-आकांक्षा तन-मन-धनाने पूर्ण करत आहेत. प्रत्येक रुग्णांचा जीव वाचला पाहिजे, ही त्यांची भावना ठेवून सुरु असलेल्या कार्य इतरांसाठी प्रेरणादायी व न विसरता येण्यासारखे आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला यांनी केले.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्यावतीने अहमदनगर इंडस्ट्रियल गॅसेस प्रा.लि.चे संचालक रमेश लोढा व विलास लोढा यांचा राजूभाई जहागिरदार यांच्या हस्ते सत्कार करुन आभार मानण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अलतमश जरीवाला, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोसिम शेख, सामाजिक कार्यकर्ते साहिल सय्यद आदि उपस्थित होते.याप्रसंगी रमेश लोढा म्हणाले, सध्या कोरोनामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत रुग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजन महत्वाचा घटक ठरत आहे. या ऑक्सिजनची निर्मिती आपल्या कंपनीत होत आहे, त्या माध्यमातून रुग्णांची प्राण वाचत आहेत. ही सेवा करण्याची आपणास ईश्‍वराने दिलेले एक संधी असून, या माध्यमातून पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. जास्तीत जास्त ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती करुन रुग्णांना जीवनदान देण्याचा आपण कसोसिने प्रयत्न करु. आमची सर्व टिम यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. सर्वांच्या सहकार्याने आपण या कोरोनावर मात करु, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी राजुभाई जहागिरदार यांनी लोढा बंधूंच्या कार्याचे कौतुक करुन आभार मानले.जाहिरात
Search
विडिओ
Recent News