जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरणावेळी सोशल डीस्टन्सिगचा फज्जा


जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरणावेळी सोशल डीस्टन्सिगचा फज्जा

भर उन्हात गर्दी केल्यामुळे कोरोना ऐवजी उस्माघाताने बळी जाण्याची भीती 

शिवसेनेचे विक्रम राठोड यांनी दिले आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन     

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) : नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविड लसीकरण मोहीम सुरु आहे. त्यात सोशल डिस्टंसीग चा पुरता फज्जा उडाला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातच कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे या ठिकाणी टाकण्यात आलेला मंडप अपुरा आहे. तेव्हा त्या मंडपाचा आकार वाढविण्यात यावा तसेच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना दिले आहे.  

           यात त्यांनी म्हंटले आहे की ,  नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातच कोरोनाग्रस्त असलेले  ६०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. आणि रुग्णालयाच्या प्रवेश द्वारावरच कोरोना प्रतिबंधक लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ती लस देत असताना तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तेथे सोशल डिस्टंसीग च्या नियमांचे कोणतेच पालन होतांना दिसत नाही तसेच लस घेण्यासाठी आलेले आबाल वृद्ध तसेच महिला मोठ्या संख्येने तेथे येतात . सकाळी १० वाजल्यापासून येथे लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात . सध्या एप्रिल मे च्या महिन्यात नगरमध्ये तापमानाचा पारा ३५ - ३६ अंश सेल्सियसच्या पुढे जात असतो . ऐन उन्हाळ्यात ही लसीकरण मोहीम सुरु आहे . या ठिकाणी लोकांना सावली मिळावी म्हणून तेथे जो मंडप उभारण्यात आला आहे. तो अतिशय तोकडा आहे. तेथे अवघे २०-३० लोक तिथे उभे राहू शकतात मात्र लसीकरणासाठी आलेल्याचा आकडा हजाराच्या घरात असतो . तेव्हा लोकांना भर उन्हातच रांगेत उभे राहून आपली वेळ येण्याची वाट पाहावी लागते. येथील कर्मचारी लस घेण्यासाठी आलेल्यांना नीट वागणूक देत नाही. मनाला वाटेल तेव्हा लसीकरण सुरु करतात आणि मनाला वाटेल तेव्हा बंद करतात . लस देतांना वशिलेबाजी करतात. त्यामुळे शिस्तीत रांगेत उभ्या असलेल्या महिला वर्गांचा तसेच वृद्धांचा संताप होतो. याबद्दल जे आवाज उठवतात त्यांना  जाणून  बुजून करणे देऊन टाळले जाते. तसेच या ठिकाणी साधी पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नाही पंखे नाहीत . आणि सोशल डिस्टंसीग चे नियम येथे कोणीही पाळत नाही . अत्यंत दाटीवाटीने लोक रांगेत ताटकळत उभे असतात. त्यामुळे कोरोनाचा हॉट स्पॉट असलेल्या या रुग्णालयात कोरोनासोबत उष्माघाताने मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही . तेथे लस घेण्यासाठी आलेल्या बऱ्याच जणांना उन्हाचा त्रास सहन झाला नाही आणि ते तिथेच चक्कर येऊन पडले. अनेकांना घरी आल्यानंतर त्रास झाला. लसीच्या साईड इफेक्ट बरोबर उष्णतेमुळे बरेच जण आजारी पडले . येत्या एक मे पासून १८ वर्षावरील सर्वांना सरसकट लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे . नगर मध्ये कोरोनाचा कहर दिवसेदिवस वाढत असताना या ठिकाणच्या गर्दीमुळे सोशल डीस्टन्सिग पाळले गेले नाही तर तेथूनच कोरोणाचा फैलाव वाढण्याची भीती आहे.  तेव्हा या परिसरात तात्काळ मोठा मंडप उभारावा तसेच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी . लसीकरण करण्यासाठी आलेल्या लोकांना सन्मानाची वागणूक द्यावी याबाबत संबंधितांना समज देऊन व्यवस्था सुरळीत करण्याचे आदेशित करावे,  अशी विनंती विक्रम राठोड यांनी केली आहे.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News