झोपडपट्टीतील गोरगरीब लोकांना स्वखर्चातून तीनशे कुटुंबियांना तीन हजार किलो धान्य वाटप:श्री. सदाबापू दोरगे


झोपडपट्टीतील गोरगरीब लोकांना स्वखर्चातून तीनशे कुटुंबियांना तीन हजार किलो धान्य वाटप:श्री. सदाबापू दोरगे

कुरकुंभ:प्रतिनिधी सुरेश बागल:

दौंड तालुक्यातील यवत गावातील इंद्रानगर येथे मोठया प्रमाणात झोपडपट्टी आहे. गरीब वर्ग  सुद्दा खूप प्रमाणात आहे. झोपडपट्टीतील लोकांना काम नसल्याने झोपडपट्टीतील गोरगरीब लोकांना श्री सदाबापू  दोरगे यांनी स्वखर्चातून तीनशे कुटुंबियांना तीन हजार किलोचे धान्य वाटपाचे काम केले आहे. एक वर्षांपूर्वी बापूंनी तीन हजार किलो धान्य वाटपाचे काम केले होते.यावेळी दोरगे यांनी सांगितले की, गोरगरीब लोकांच्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होते असतात त्या समस्या सोडवण्यासाठी मी अशा प्रकारच्या अन्यधान्य वाटप करण्याचे काम मी स्वतःकरत आहे.आदरणीय श्री रमेश आप्पा थोरात पुणे जिल्हा पिडीसी बँक चेअरमन व माजी आमदार यांच्या हस्ते त्या कुटुंबाला धान्य वाटप करण्याचे काम करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित झेडपी सदस्य श्री गणेश भाऊ कदम , माजी पंचायत समिती सदस्य श्री कुंडलिक नाना खुटवड,  ह भ प सोन्याबापु कुदळे , ग्रा. स.सौ सुजाता ताई कुदळे,ग्रा. स.  सौ नंदा बिचकुले

आणि श्री .मंगेश रायकर समता परिषद कार्याध्यक्ष दौंड तालुका ,सामाजिक कार्यकर्ते श्री अण्णा दोरगे,सामाजिक कार्यकर्ते श्री दादा माने, श्री रोहन दोरगे व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी दोरगे बापूंचे तिथल्या गोरगरीब जनतेने मनापासून आभार मानले,व मोठ्या प्रमाणात कौतुक केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News