ठाणे येथील विद्यार्थी शमसोद्दिन अमिर मुलानीचा प्रामाणिकपणा!


ठाणे येथील विद्यार्थी शमसोद्दिन अमिर मुलानीचा  प्रामाणिकपणा!

शेवगाव तालुक्यातील एका केंद्रप्रमुखांकडून नजरचुकीने मोबाईल क्रमांकाचा एक अंक चुकीचा झाल्याने ऑनलाईन

 व्यवहारात ठाणे शहरातील दुस-याच व्यक्तीला पैसे ट्रान्स्फर झाले. परंतु, ठाणे येथील संबंधित विद्यार्थी शमसोद्दिन अमिर मुलानी याने ते पैसे तातडीने पुन्हा परत करत प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दाखवून दिले.

ऑनलाईन अर्थिक व्यवहारात बॅंकेचा अकाऊंट क्रमांक वा मोबाईल क्रमांक यातील एक अंक जरी चुकला तरी पैसे दुस-याच व्यक्तीला ट्रान्स्फर होतात. थोडीशी चूक झाली तरीही अशा व्यवहारात पुन्हा पैसे त्या संबंधित व्यक्तीकडून घेणे अनेकदा अत्यंत जिकरीचे होते. ऑनलाईन व्यवहारात असे अनेकदा अनुभव येतात...

असे झाले की शेवगाव तालुक्यातील राणेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश लबडे यांनी रविवारी ( दि. २५ )  एका व्यवहारात एक हजार रूपये देण्यासाठी फोन-पे चा वापर केला.  कॉन्टॅक्ट लिस्टला मोबाईल क्रमांक सेव्ह नसल्याने नसल्याने  तो टाकून सर्च करताना त्यांच्याकडून  नकळतपणे शेवटचे अंक ६२ ऐवजी ६३ झाले गेले अन् त्यांनी क्षणार्धात पेमेंटही केले. समोरच्या व्यक्तीला पेमेंटचा मेसेज न आल्याने आता  पैसे कुठे ट्रान्स्फर झाले याचा शोध त्यांनी घेण्यासाठी संबंधित मोबाईल क्रमांकाच्या व्यक्तीला कॉल केला. त्यावेळी,  ठाणे येथील एफवायबीएसस्सीत शिक्षण घेत असलेल्या शमसोद्दिन मुलानी यांना ते पैसे ट्रान्स्फर झाल्याची लबडे यांची खात्री पटली. पैसे परत करावेत ही विनंती लबडे यांनी त्यास केली.  विशेष म्हणजे एक हजार रूपये ट्रान्स्फर केल्यानंतरही बॅंकेने १४ रूपये कट केल्याने त्यांच्या खात्यावर ९८६ रूपये शिल्लक होते.  तसे सांगून शमसोद्दिन मुलानी याने तातडीने ९८५ रूपये केंद्रप्रमुख लबडे यांच्या खात्यावर ट्रान्स्फर करून तसा कॉलही त्यांना केला. रक्कम थोडी असली तरीही  शमसोद्दिन मुलानी याच्या प्रामाणिकपणामुळे लबडे यांच्या जीवात जीव आला.

 अधिक चौकशी करता शमसोद्दिन अमिर मुलानी याचे कुटूंब सातारा जिल्ह्यातील असून वडिल अमिर मुलानी हे ठाणे येथे क्रूड ऑईल कंपनीत काम करतात. घरची परिस्थिती तशी बेताचीच, पण शमसोद्दिन मुलानी याने प्रामाणिकपणा हे मानवी मूल्य आचरणात आणले हे विशेष कौतुकाचे ठरले आहे. केंद्रप्रमुख लबडे यांनी शमसोद्दिन मुलानी विद्यार्थ्याच्या प्रामाणिकपणाचे  विशेष आभार मानत काही रक्कम परत त्यास बक्षिस म्हणून ट्रान्स्फर केली.

-------------------------------------------------

जाहिरात
Search
विडिओ
Recent News