खाकी वर्दीतला देव माणूस, दौंड तालुक्यातील निराधार ज्येष्ठांना दौंड पोलिसांकडून धान्याचे किट,आस्थेने केली विचारपूस


खाकी वर्दीतला देव माणूस, दौंड तालुक्यातील निराधार ज्येष्ठांना दौंड पोलिसांकडून धान्याचे किट,आस्थेने केली विचारपूस

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

पोलिस म्हटले की धाक, दरारा, राकट बोलणे, पळापळ, धावपळ,जुने लोक सांगायचे पोलिस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढायची नाही, काही मोजके लोक सोडले तर बऱ्यापैकी लोक अजून जुन्या  लोकांचे सांगणे ऐकून आहेत आणि पोलिसांपासून दोन हात दूरच राहतात परंतु दौंड पोलिस स्टेशनचे प्रोबेशनरी पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांनी विचारच बदलला आहे, दौंड तालुक्यातील निराधार जेष्ठ महिला तसेच पुरुष यांच्या घरी जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस करून त्यांना धान्याचे किट दिले आहे, पोलीस एखाद्याचा शोध घेत थेट त्याच्यापर्यंत पोहोचले म्हणजे तो एखाद्या प्रकरणात सापडला असाच विचार केला जातो. सध्या दौंड पोलीस हे काही विशेष जेष्ठ नागरिकांचा शोध घेण्यासाठी वाड्यावस्त्या पिंजून काढत आहे. मात्र, हा "शोध" कोणावरही कारवाईसाठी केला जात नसून तो जेष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी केला जात आहे. कोरोना व लाॅकडाऊनच्या काळात आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये तसेच उपासमारीची वेळ येऊन म्हणून जेष्ठ निराधार नागरीकांना पोलीसांची मदत हा अभिनव उपक्रम दौंड पोलीसांनी सुरू केला आहे. या माध्यमातून दौंड येथील परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांच्या वतीने जेष्ठ निराधारांना अन्नधान्यांच्या किटचे वाटप केले जात आहे. त्याचबरोबर सॅनिटायझर व मास्कचे वाटप सुरू केले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊनचा पर्याय निवडला आहे. या काळात ज्यांना कोणाचाच आधार नाही अशा जेष्ठ निराधार नागरीकांसाठी पोलीसांनी पुढाकार घेऊन त्यांना लागणारी सर्व मदत करण्याची अभिनव संकल्पना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार दौंड पोलीसांनी मदतीचे कार्य सुरू केले आहे. प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांच्या सहकार्यांने दौंड तालुक्यातील जेष्ठ निराधार महिला व पुरूषांची माहिती संकलित केली जात आहे. या माहितीच्या आधारे दौंड पोलीसांचे पथक थेट त्याच्यापर्यंत जाऊन त्यांच्या आरोग्याची विचारपूस करीत आहे. त्यांचे अडीअडचणी जाणून घेत आहेत. तसेच कोरोना (टेेस्ट) तपासणी, लस, औषधोपचार यासंदर्भातील समज गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर अन्नधान्याचे किटचे वाटप केले जात आहे. यामध्ये आत्तापर्यंत २५ जेष्ठ नागरिकांपर्यंत हि मदत पोहच झाली आहे. अजून माहिती मिळेल तशी मदत केली जाणार आहे. या उपक्रमासाठी दौंड पोलीस ठाण्यातील सर्वच पोलीस स्टाफचे सहकार्य लाभत आहे. अशी माहिती परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News