शिक्षकांचे 50 लाखाचे विमा प्रस्ताव लवकर मंजूर करावेत . गौतम कांबळे राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांची मागणी .


शिक्षकांचे 50 लाखाचे विमा  प्रस्ताव लवकर मंजूर करावेत .  गौतम कांबळे राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांची मागणी .

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

 शिक्षकांचे 50 लाखाचे विमा प्रस्ताव लवकर मंजूर  करावे व या विमा योजनेला डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी  गौतम कांबळे राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक महासंघ संलग्न मूलनिवासी शिक्षक संघ यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे केली आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना  गौतम कांबळे म्हणाले की राज्य सरकारने शिक्षण विभाग सोडून इतर विभागातील सहा जिल्ह्यातील आठ कर्मचाऱ्यांचे 50 लाखाचे विमा प्रस्ताव मंजूर केले आहेत .लवकरच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाखाची मदत देण्यात येणार आहे .त्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन .

त्याचबरोबर राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी covid-19 च्या काळात आपल्या प्राणाची बाजी लावून काम केले आहे . covid केअर सेंटर,  स्वस्त धान्य दुकान , तपासणी नाके येथे काम केले आहे .तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या राज्य सरकारच्या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेणे व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना कळविणे इ.कामे केली आहेत .ही कामे करत असताना राज्यातील अनेक शिक्षक मृत्युमुखी पडले आहेत परंतु त्यांना पन्नास लाख विमा योजनेचा लाभ अद्याप देण्यात आलेला नाही .या लाभापासून त्यांचे कुटुंबीय वंचित आहेत .त्यामुळे त्यांच्या वारसांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .राज्य सरकारला या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की आपण शिक्षकांचे 50 लाख विम्याचे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून त्यांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यात यावा व या विमा योजनेला डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे . मा . दत्तात्रय जगताप शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण विभाग यांचेशी संपर्क साधला असता शिक्षकांचे विमा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत अशी माहिती संघटनेला  दिली असल्याचे श्री गौतम कांबळे राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले  .यावेळी श्री विठ्ठल सावंत राज्य महासचिव श्री हौशीराम गायकवाड  कार्याध्यक्ष श्री दादा डाळिंबे  कोषाध्यक्ष श्री विनोद चव्हाण उपाध्यक्ष श्री चंद्रकांत सलवदे जिल्हाध्यक्ष पुणे संतोष ससाने जिल्हा महासचिव पुणे हे पदाधिकारी उपस्थित होते .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News