जिल्हा परीषद कर्मचाऱ्यांना कोरोना बाबत औषध उपचार व रुग्णालय सुविधा पुरविण्यात यावी - शेखर गायकवाड.


जिल्हा परीषद कर्मचाऱ्यांना कोरोना बाबत औषध उपचार व रुग्णालय सुविधा पुरविण्यात यावी - शेखर गायकवाड.

नानासाहेब मारकड भिगवण प्रतिनिधी:

सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा परीषद कर्मचाऱ्यांना औषध उपचार व रुग्णालय सुविधा पुरविण्यात असे कर्मचारी संघटनेचे  जिल्हाध्यक्ष शेखर गायकवाड यांनी सांगितले.

सदरचे  निवेदन लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या  वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी मा. आयुष प्रसाद साहेब यांना यांना देण्यात आले आहे.

   पुणे जिल्ह्यामध्ये कोवीड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढत आहे शहरी आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे.त्यातच सर्वसामान्य जनतेला रेमडीसिवीर इंजेक्शनाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने जिल्हा परीषद प्रशासनाने जिल्हा परीषद निधीतुन रेमडीसिवीर खरेदीचा निर्णय कौतुकास्पद असुन सर्वसामान्य जनतेला दिलासा देनारा आहे. याच पाश्वर्भूमीवर जिल्हा परीषद अंतर्गत विविध संवर्गाचे अधिकारी आणि कर्मचारी या कोरोना कालावधीत कार्यरत आहेत.त्यामुळे सदर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्याना कोरोनाची लागन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावेळी सदर कर्मचाऱ्यांना तातडीने उपचार मिळतील असे रुग्णालय अथवा कोवीड सेंटर उपलब्ध होइल अशा रुग्णालयासोबत करार करणेत यावा जेणेकरुन कर्मचाऱ्यांना वेळेत उपचार मिळेल.आणि त्यातुनच कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये प्रशासनाबाबत आपुलकीची भावना निर्माण होइल. असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हासंगटनेचे अध्यक्ष शेखर गायकवाड, राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी, किशोर कुलकर्णी, मनोहर वन्नम ,सुहास संचेती, विकास पापळ आदी संघटनेचे पदादिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News