कोविड -१९ बाबतच्या अफवा व त्याबद्दलची रुग्णांच्या मनातील भीती लक्षात घेता डॉक्टरांनी रुग्णांना मानसिक धीर देण्याचे काम करावे-जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे


कोविड -१९ बाबतच्या अफवा व त्याबद्दलची रुग्णांच्या मनातील भीती लक्षात घेता डॉक्टरांनी रुग्णांना मानसिक धीर देण्याचे काम करावे-जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे

कोविड -१९ बाबतच्या अफवा व त्याबद्दलची रुग्णांच्या मनातील भीती लक्षात घेता डॉक्टरांनी रुग्णांना मानसिक धीर देण्याचे काम करावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी  केले.

 शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण: चापडगाव येथे जनशक्ती कोविड केअर सेन्टरच्या शाखा नंबर दोनच्या उद्घाटन प्रसंगी केले. चापडगाव येथे चापडगाव हायस्कूल चापडगाव येथे कोविड-१९ केअर सेंटरचे आज उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. शिवाजीराव काकडे होते. याप्रसंगी डॉ.श्वेता फलके/सूर्यवंशी, डॉ.पाडळे जी.बी., डॉ.पाटील आर.बी., डॉ.काटे एस.टी., डॉ.नेमाने पी.जे. डॉ.गमे एम.व्ही., सरपंच शहादेव पातकळ, उपसरपंच सुरेश नेमाने, स्वभिमानीचे प्रशांत भरात, बाळासाहेब फटांगरे, कल्याणराव नेमाने, नवनाथ ढाकणे, गणेश ढाकणे, अशोक ढाकणे, अण्णा गोरे, भारत लांडे, रामकिसन सांगळे, सुखदेव खंडागळे, नवनाथ खेडकर, भाऊसाहेब कणसे, रावसाहेब लांडे, संतोष गायकवाड, गणेश दारूणकर, अशोक गाढे, लक्ष्मण पातकळ, भास्कर वाल्हेकर, अशोक औटी आदी मान्यवर उपस्थित होते. सोशल डिस्टंगसिंगचे पालन करुन कार्यक्रम घेण्यात आला. 

यावेळी सौ. काकडे म्हणाल्या की, तालुक्यात कोविड रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ॲड. काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अमरापूर येथे व आता चापडगाव येथे  कोविड सेंटर चालू करत आहोत. यामध्ये गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अमरापूर व चापडगाव येथील कोविड सेंटर सुरु होण्यासाठी डॉ.श्वेता फलके यांचा मोठा वाटा आहे. आबासाहेबांचा वारसा व त्यांनी दिलेली ध्येय धोरणांचे पालन करत आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांसाठी कामे करत आहोत.  आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहातील सर्व कर्मचारी घटक मिळून रुग्णांसाठी राहणे, दोन टाईम जेवण व चहा नाष्टा इ. सोय आम्ही करत आहोत. डॉक्टरांनी रुग्णांचे मनोधैर्य वाढवावे व रुग्णाची बाहेर होणारी आर्थिक लूट थांबवावी असे मी डॉक्टरांना आव्हान करते असेही सौ.काकडे म्हणाल्या.

डॉ.गमे म्हणाले आम्हाला या कोविड सेंटर चालू करण्यासाठी ॲड. काकडे यांनी जी मदत केली आहे ती खूप मोठी आहे. त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवणार आहोत.

प्रशांत भराट म्हणाले की, ॲड. काकडे दाम्पत्यांनी आजची तालुक्याची परिस्थिती ओळखून अमरापूर व चापडगाव येथे कोविड सेंटर चालू केले आहे. लोकहिताची कामे ते सतत करत असतात. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्यासोबत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नेहुल पी.एन. यांनी केले तर आभार ढोले के.व्ही. यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News