महाराष्ट्र शासनाने मदतीचा हात पुढे करावा : अभिनेते प्रशांत नेटकेपाटील यांची मागणी


महाराष्ट्र शासनाने मदतीचा हात पुढे करावा : अभिनेते प्रशांत नेटकेपाटील यांची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत :) कोरोना काळात चित्रपटातील कलाकार, सह्कलाकार तसेच लोक कलावंतांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या हाताला काम नाही.मागील वर्ष कुठलाहि काम नसताना घराचे भाडे,बैंक हप्ता,मुलांच्या शाळेच्या फी,लाईट बिल,किराणा,याचे अजुन पैसेही दिले नाही.आणी मनोरंजन क्षेत्र असल्याने सर्वात शेवटी सुरु होत होते.तोच पुन्हा लॉकडाउन . अशा वेळी सरकारने या कलावंतांच्या पाठीशी उभे राहून त्याना मदतीचा हात देण्याचे  आवाहन अभिनेते प्रशांत नेटकेपाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.

करोना मुळे मनोरंजनाचे ठप्प झाले आहे. त्यामुळे या कलावंतांना जगण्यासाठी मदत दिली पाहिजे . त्यामुळे एका मोठ्या समस्येचे काहीअंशी समाधान होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पहिल्या पासून लोककलावंतांच्या हाताला काम नाही.तसेच  चित्रपट क्षेत्रातील कलाकार,तंत्रज्ञ लाईट, साऊंड वाले, डेकोरेशनचे मालक ,कर्मचारी हे गेले दीड वर्ष घरी बसून आहेत. हे सर्व 400 ते 600 रुपयात काम करतात . त्यामुळे त्यांचेही हातावर पोट आहे .अशा कलावंतांच्या कुटुंबियांची उपासमार सध्या सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागातील कलावंतांचे हाल सुरू आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात या लोककलावंतांचे मोठे काम आहे लोकांमध्ये समाजप्रबोधन करण्याचे काम हे कलावंत करत आलेले आहेत.वृध्द कलावंतानाही   महारास्ट्र शासन मदत करते.पण सध्या गरज आहे ती 30ते50 वयोगटातील कलाकारांना मदत करण्याची कारण त्यांच्या वर संपुर्ण कुटूबाची जबाबदारी आहे.आज महाराष्ट्रात शासनाने सर्वांसाठी काही ना काही मदत देऊ केली आहे.तशाच प्रकारची मदत या  कलाकारांनाही मिळाल्यास या कलावंतांच्या कुटुंबियांची उपासमार थांबेल. तूर्तास या क्षणाला या कलावंतांच्या खात्यात यथाशक्ती रक्कम जमा करून शासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे .यासोबतच आर्केस्ट्रात काम करणारे कलाकार,नृत्य कलाकार विविध सिरीयल मध्ये काम करणारे वादक तांत्रिक विभागात काम करणारे अशा कलाक्षेत्रात विविध स्तरावर काम करणाऱ्या सहकलावंतांचा विचार राज्य आणि केंद्र सरकारने करावा कारण चित्रपट कलाकार म्हंटले की मोठं मोठे सिलेब्रिटी समोर येतात.ज्याना मदतीची गरज नाही.पण या सिलेब्रिटी कलाकारां व्यतिरिक्त अनेक सह कलाकार आणि तंत्रज्ञ चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत त्या सर्वांचा या अवघड परिस्थितीत विचार करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे .जर अशा कलावंतांच्या कुटुंबियांची उपासमार अशीच चालू राहिली तर कलावंत संपुन जाईल या कलावंतांना राजाश्रय मदतीचा द्यावा. तसेच सर्वपक्षीय कलाकार नेत्यांनी,महामंडळ,सर्व कलाकार संघटना यानी आता कलाकाराचे प्रश्न मांडण्यास मदत करावी.हीच अपेक्षा.

           

जाहिरात
Search
विडिओ
Recent News