इंडोनेशियाच्या पाणबुडीचा शोध आणि बचावकार्यासाठी भारतीय नौदलाची "खोल पाण्यातून बचाव करणारी नौका" रवाना


इंडोनेशियाच्या पाणबुडीचा शोध आणि बचावकार्यासाठी भारतीय नौदलाची "खोल पाण्यातून बचाव करणारी नौका" रवाना

नवी दिल्ली, 22 एप्रिल 2021

इंडोनेशियाचे नौदल–तेन्तरा नैशनल इंडोनेशिया-अंगकाटनलौत एल ला सहाय्य करण्यासाठी भारतीय नौदलाने आपली खोल पाण्यात बुडालेल्या नौका किंवा पाणबुड्यांचा शोध आणि बचाव करणारी नौका –DSRVआज रवाना केली आहे. इंडोनेशियाची KRI नांग्गला ही पाणबुडी 21 एप्रिल 21 पासून बेपत्ता असूनभारतीय नौका तिचा शोध आणि बचावात सहकार्य करणार आहे.

आंतरराष्ट्रीय पाणबुडी बचाव आणि सुटका कार्यालयातून भारतीय नौदलाला 21 एप्रिल रोजी एक अलर्ट मिळालाज्यानुसारइंडोनेशियाची पाणबुडी बेपत्ता झाल्याची सूचना देण्यात आली होती. बालीच्या उत्तरेला 25 मैलांवर असतांना ही पाणबुडी बेपत्ता झाल्याचे वृत्त असून तिच्यात 53 अधिकारी/कर्मचारी होते. ज्यावेळीपाणबुडी बेपत्ता होते किंवा बुडते त्यावेळी तिचे बचावकार्य हाती घेतले जात असताना पाण्याखाली हा शोध घेण्यासाठी तसेच बचावासाठी काही विशेष उपकरणांची गरज असते. DSRV च्या मदतीने अशी शोध आणि बचाव यशस्वीपणे मोहीम हाताळणाऱ्या जगातल्या काही मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. भारतीय  नौदलाची DSRV व्यवस्था 1000 मीटर खोल पाण्यात बुडालेल्या पाणबुडीचा शोध घेण्यात सक्षम असून त्यात साईड स्कॅन सोनार ही अत्याधुनिक प्रणाली आणि दुरून कार्यरत केले जाऊ शकणाऱ्या वाहनाची -ROV प्रणाली देखील आहे. ज्यावेळी या पाणबुडीचा शोध लागेलत्यावेळी DSRV चे सहाय्यक मोड्यूल –सबमरीन रेस्क्यू व्हेईकल SRV या पाणबुडीत अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यासाठी पुढे जाईल. त्याशिवाय पाणबुडीला काही अत्यावश्यक सेवा-वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी देखील, SRV चा वापर होऊ शकेल.

भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सर्वसमावेशक राजनैतिक भागीदारीअंतर्गतभारतीय आणि इंडोनेशियाच्या नौदलामध्ये कार्यान्वयन सहकार्याविषयी एक भक्कम भागीदारी निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही नौदल सैनिक संयुक्त सराव करत असून त्यांच्यात एक समन्वय प्रस्थापित झाला आहे. या समन्वयाचा उपयोगसध्याच्या या बचाव कार्यात होऊ शकेल.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News