रिक्षावाले फेरीवाले यांना शासकीय मदतिचा लाभ कधी मिळणार- संघर्ष संघटना.


रिक्षावाले फेरीवाले यांना शासकीय मदतिचा लाभ कधी मिळणार- संघर्ष संघटना.

राज मोहम्मद शेख प्रतिनिधी

 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी सुमारे आठ दिवसापूर्वी  कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी काही योजना जाहीर केल्या त्यामध्ये फेरीवाले आणि रिक्षावाले यांना चालू महिन्यासाठी पंधराशे रुपये सानुग्रह मदत देण्याचे जाहीर केले या योजनेचा लाभ फेरीवाले व रिक्षावाल्यांना मिळण्यासाठी संघर्ष सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व काही पत्रकार यांनी तहसीलदार व प्रांताधिकारी संगमनेर यांच्याशी संपर्क साधला असता  त्यांच्याकडून अद्याप आम्हाला याबाबत कोणती माहिती नाही असे मोघम उत्तर देण्यात आले .वास्तविक covid-19 मुळे त्रस्त झालेल्या लोकांना त्वरित सानुग्रह मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे परंतु त्याची पूर्तता काय आहे ,काय नाही याची कोणतीही माहिती शासकीय कार्यालयांकडे नाही तसेच ते त्याबाबतचे अर्ज स्वीकारण्यास देखील तयार नाहीत, त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत तरी याबाबत लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी मागणी संघटनेकडून अॅड संग्राम जोंधळे, नागेशभैय्या परदेशी सामाजिक कार्यकर्ते रजत अवसक, अजिंक्य उपासनी, निलेश अष्टेकर, सलिम बाबा कुरेशी,  अब्दुला चौधरी, केशवराव जाधव,  वैशाली राऊत, सोनाली मुळे तसेच  पत्रकार धीरज ठाकूर ,अनंत पांगारकर ,मंगेश सालपे इत्यादींनी केली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News