गावा गावात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी ने धरला जोर,तरुणांचा सहभाग कौतुकास्पद


गावा गावात कोविड  सेंटर सुरू करण्याची मागणी ने धरला जोर,तरुणांचा सहभाग कौतुकास्पद

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी 

दौंड शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे,आणि रुग्ण होम कोरेंटन आहेत ते ठण ठणीत बरे होत आहेत, परंतू सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात दाखल केल्या नंतर रुग्णांच्या मनात धास्ती बसते आता माझे काय होईल,बेड,ओक्सिजन,इंजेक्शन गोळ्या हे मिळेल का,एवढे पैसे जुळतील का अशा अनेक प्रश्नांनी ती व्यक्ती खचून जातो त्यामुळे 

या दृष्टीने विचार करून गावात किमान पन्नास बेडचे कोविड सेंटर व्हावे यासाठी गावातील व्हॉट्स ऍप ग्रुपवर तरुणांकडून पुढाकार घेऊन मागणी वाढली आहे,याविषयी

दौंड तालुका ग्रामपंचायत सरपंच,पोलीस पाटील,सर्व सदस्य,आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी विचार करावा,मासिक मिटिंग मध्ये खालील विषय घ्यावेत

*१}रुग्णवाहिका*

*2} कोविड positive  रूग्ण विलगीकरण केंद्र* 

*3}अंत्यविधी साठी इलेक्ट्रिक किंवा गॅस पध्दतीचे विद्युतदाहिनी उभारण्यात यावेत,पाठपुरावा करून वरिष्ठ पातळीवर तरतूद करण्यात यावी,असे सुरू केलेल्या विद्युतदाहिनीत अंत्यविधी करण्यात येऊ शकते. यामुळे प्रति व्यक्ती ३00 ते 400 किलो लाकडाची बचत होऊ शकते.*

*सर्व सामान्य जनतेला भविष्यात लाकडं मिळवणे फार कठीण आहे* 

निसर्गाच्या दृष्टीने वृक्ष तोड योग्य नाही,एक वृक्ष कित्येक माणसांना ऑक्सिजन देते,ऑक्सिजन चे महत्व आता सर्व जनतेला समजायला लागले आहे.यामुळे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची मानसिकता बदण्यासाठी याचा उपयोग होईल,आणि सर्वच रुग्ण टकाटक बरे होऊन आपल्या कुटुंबात परत येतील,यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची मागणी वाढली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News