कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आॅक्सिजनचा तुटवडा, भागवण्यासाठी प्रशासनाची वेल्डिंग दुकांनावर धडक मोहीम राबवून सिलेंडर हस्तगत


कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आॅक्सिजनचा तुटवडा, भागवण्यासाठी प्रशासनाची वेल्डिंग दुकांनावर धडक मोहीम राबवून सिलेंडर हस्तगत

कर्जत प्रतिनिधी (मोतीराम शिंदे) - कर्जत तालुक्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता आणि आॅक्शिजन सिलेंडरची निर्माण झालेली कमतरता लक्षात घेता कर्जत येथील प्रशासकीय अधिकारी यांनी कर्जत तालुक्यातील सर्व वेल्डिंगचे काम करणाऱ्या दुकांदारांवर एकाच वेळी धडक मोहीम राबविण्यात आली. आणि त्यांच्या दुकानातील सर्व सिलेंडर ताब्यात घेण्यात आले. 

आॅक्शिजनची संभाव्य कमतरता लक्षात घेत काल   तालुका प्रशासनाने तालुक्यातील मिरजगाव, राशीन, कर्जत शहर परिसरात तीन पथके तयार करून या पथकामार्फत वेल्डिंग दुकानावर धडक मोहीम राबविण्यात आली या प्रत्येक पथकात ४ पोलीस अधिकारी व कर्मचारीवर्गाची नियुक्ती करण्यात आली होती. यात कर्जत शहरातील कारवाई साठी नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव  सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने व पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच राशिन येथील पथकात कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव व कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले होते. तर मिरजगाव भागातील वेल्डिंग दुकानासाठी कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे व प्रांताधिकारी अर्चना नष्टे आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या वेळी तालुक्यातील वेल्डिंग दुकानातून एकुण ५३ सिलेंडर हस्तगत करण्यात आले होते. या पैकी २७ सिलेंडर हे आॅक्सिजनणे भरलेले होते. या भरलेल्या २७ सिलेंडर पैकी १५ सिलेंडर हे जामखेड येथील रुग्णालयात आॅक्सिजनचा अतिशय तुटवडा निर्माण झाला असल्याने जामखेडला १५ सिलेंडर तातडीने पाठविण्यात आले. असून बाकीचे १२ सिलेंडर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात जमा करण्यात आले. त्यामुळे कर्जत सह जामखेड येथील रुग्णालयातील रुग्णांना या कर्जत प्रशासनाने केलेल्या मोहिमेचा फायदा झाला आहे. 

या आगळ्यावेगळ्या पद्धतीने केलेल्या धडक कारवाई मुळे कर्जत तालुका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची एकजूट , कामाचे अचूक निर्णय व नियोजन, सर्वांचा समनव्य , व नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी केल्याने सदरची धडक मोहीम यशस्वी झाली. या बद्दल दोन्ही तालुक्यातील जनते कडून कर्जतच्या अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News