शेवगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ व गुरूमाऊली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोरोना योद्धा म्हणून काम करणा-यांसाठी मास्क, ग्लोज व सॅनिटाझरचे वाटप केले.


शेवगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ व गुरूमाऊली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोरोना योद्धा म्हणून काम करणा-यांसाठी मास्क, ग्लोज व सॅनिटाझरचे वाटप केले.

शेवगाव प्रतिनिधी  सज्जाद  पठाण:

शहरातील ग्रामीण रूग्णालय,  पोलिस स्टेशन आदी ठिकाणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुमारे आठ हजार रूपये खर्चून सॅनिटायझर, मास्क व ग्लोजचे स्वयंप्रेरणने वितरण केले. या वेळी प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष रमेश गोरे, संतोष गर्जे,  सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देशपांडे, प्रताप लांडे आदी उपस्थित होते. पोलिस स्टेशन मध्ये पीआय प्रभाकर पाटील यांच्याकडे सॅनिटायझर, मास्क व ग्लोज सुपूर्द करण्यात आले.

 या विधायक उपक्रमाचे जि.प. अध्यक्षा राजश्री घुले, पं.स. सभअधिकारीणणढण क्षितीजभैय्या घुले,   तहसिलदार अर्चना पागिरे, नायब तहसिलदार मयूर बेरड, विकास जोशी, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, गटशिक्षण अधिकारी रामनाथ कराड,  शिक्षण विस्तार अधिकारीण शैलजा राऊळ आदींनी कौतुक केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News