अमरापुर येथे जनशक्ती कोविंड केअर सेंटर सेंट रसुरू करण्यात आले एडवोकेट शिवाजीराव काकडे


अमरापुर येथे जनशक्ती कोविंड केअर सेंटर सेंट रसुरू करण्यात आले एडवोकेट शिवाजीराव काकडे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण:

दि (२१) कॉ.आबासाहेब काकडे यांचा आम्हास मिळालेला वारसा व त्यांची आम्हास मिळालेली शिकवण की, संकटात जात धर्म सोडून गोरगरिबांची व मानवतेची सेवा करा. हाच आबासाहेबांचा संदेश डोळ्यासमोर ठेऊन त्या भावनेतून आपण आबासाहेबांनी स्थापन केलेल्या अमरापूर हायस्कूल अमरापूर येथे जनशक्ती कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. यावेळी अॅड.शिवाजीराव काकडे, डॉ.श्वेता फलके व डॉ.अरविंद पोटफोडे यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे, जनशक्तीचे शहराध्यक्ष सुनिल काकडे, सुरेश नाना चौधरी, राजेंद्र पोटफोडे, प्राचार्य आर.एन.मगर, सरपंच विजय पोटफोडे, म्हतारदेव आव्हाड, भारत भालेराव, शिवाजी कणसे, शिवाजी औटी, रज्जाक भाई शेख, विष्णू दिवटे, राजेंद्र फलके, अशोक दातीर, अर्जुन पठाडे, शहादेव वाकडे, शेषे राव फलके आदि प्रमुख उपस्थितीत होते. 

 यावेळी अध्यक्षस्थानी बोलताना अॅड.काकडे म्हणाले की, जागतिक महामारीचे संकट सध्या महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण जगावर आहे. अशा या संकटांमध्ये नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात अमरापुर सारख्या ठिकाणी डॉ. अरविंद पोटफोडे यांचे कार्य अमूल्य आहे. आपण जनतेचे काही देन लागतो. जनसेवा हा मानवतेचा धर्म आहे या भावनेतून सर्वांनी काम केले पाहिजे. आज कोविड रुग्णांसाठी अमरापूर येथे सेंटर सुरु केले आहे. संस्थेचे सर्व कर्मचाऱ्यांनी वर्गणी करून रुग्णांच्या दोन्ही वेळची जेवणाची व नाश्त्याची सर्व सुविधांची सोय केली आहे. अमरापूर ग्रामस्थ व सरपंच उपसरपंच तसेच सदस्य यांचेही या कार्याला मोठे सहकार्य लाभते आहे. भविष्यातही जनतेसाठी संस्थेची इमारत न इमारत खुली करून देणार. एकही रुग्णांना बेड कमी पडू देणार नाही. असेही ते बोलताना म्हणाले. सोशल डिस्टंगसिंगचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला. 

डॉ.पोटफोडे म्हणाले की, हा कालावधी खूपच भयानक आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना कमी खर्चात बरे करणे हेच माझे ध्येय आहे. या सेंटरच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मला उपलब्ध झालेली आहे. डॉ.विजय फलके व डॉ.श्वेता फलके मॅडम यांचेही वेळोवेळी मला मार्गदर्शन लाभत आहे. या कोविड सेंटरसाठी अॅड.शिवाजीराव काकडे, जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News