स्वयंघोषित एन टी भाई टोळीवर मोक्का अंतर्गत बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांची कारवाई,


स्वयंघोषित एन टी भाई टोळीवर मोक्का अंतर्गत बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांची कारवाई,

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी 

बारामती शहरात हॉटेल मालकाला धमकी देऊन मी आत्ताच मोक्कातून बाहेर आलो असे सांगून स्वयंघोषित एन टी भाई टोळीवर बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी हॉटेल मालकाला धमकावल्या प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे, बारामती शहर पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 7/2/21 रोजी सायंकाळी 8:30 ते 9:30 वाजताच्या दरम्यान स्वयंघोषित एन टी भाई उर्फ नितीन तांबे हा त्याच्या इतर चार पाच साथीदारा बरोबर फलटण रोड वरील हॉटेल मध्ये येऊन मी एन टी भाई आहे इथून पुढे मला घाबरायचे, दर महिन्याला मला 25000 हजार रुपये हप्ता द्यायचा,असे दमदाटी करून, तुला हॉटेल नीट चालवायचे असेल तर माझा माणूस दर महिन्याला येईल त्याच्याकडे 25000 रुपये द्यायचे,मी स्वतः एन टी भाई जर आलो तर तुला ज ड जाईल लक्षात ठेव अशी दमदाटी केली,तर दुसरा आरोपी अमिन दिलावर याने सांगितले एन टी भाई चे हात लांब पर्यंत पोहचलेले आहेत,तू जर आमच्यावर गुन्हा दाखल केला तर आम्ही जेल मध्ये बसू पण तुझा गेम जेल मधुन वाजवू असे म्हणून नितीन तांबे याने  काऊंटर मध्ये हात घालून मॅगडॉल नंबर वन व्हिस्कीच्या दोन कॉटर आणि मगडॉल नंबर वन रमची एक कॉटर घेऊन टेबलवर जाऊन पित बसले,तर अमिन दिलावर याने फ्रिज मधील चार किंगफिशर बियर च्या चार बाटल्या घेऊन सर्वजण पित बसले,9:45 वाजता दिलावर याने मालका जवळ जाऊन तू आत्ताच शहाणा हो दर महिन्याला 25000 रुपये हप्ता दे वरना

एन टी भाई चिडला तर तुझं काही खर नाही असे म्हणून टेबलवर नितीन तांबे याच्या कानात काहीतरी सांगितले, तो उठला आणि मालकाजवळ जाऊन तुला लय माज आलाय का मी आत्ताच मोका तोडून बाहेर आलो आहे असे म्हणून एक फाईट मारली आणि खिशातील चाकू काढून तू जर हप्ता नाही दिला तर हॉटेलच्या बाहेर आल्यावर तुझे तुकडे करून टाकीन अशी धमकी देऊन गल्ल्यातील 7200 रुपये आणि दुकानाचे लायसन चोरून नेले असल्याची फिर्याद हॉटेल मालकाने नोंदवली त्यानुसार यातील आरोपी नितीन बाळासो तांबे,अमिन दिलावर इनामदार आणि संजय गणेश बोडरे व इतर दोन अनोळखी आरोपी  सर्व राहणार बारामती तालुका बारामती यांच्यावर बारामती शहर व परिसरात खून,खुनाचा प्रयत्न,जबरी चोरी,दरोडा,खंडणी मागणी असे 13 संघटितपणे केल्याचे निष्पन्न झाले आहे,सदर आरोपींविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्या विषयी मनोज लोहिया महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांना प्रस्ताव देण्यात आला होता तो त्यांनी मंजूर केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली आहे,नारायण शिरगावकर यांनी बारामती येथील पदभार स्वीकारल्यानंतर 18 गुन्हेगारी टोळ्या विरूद्ध 18 मोका अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत, त्यामध्ये 120 आरोपी अटक केले असून टोळी प्रमुख आणि सदस्य यांच्या मुसक्या आवळल्या आहेत,या गुन्ह्याचा तपास नारायण शिरगावकर स्वतः करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सपो नि मुकुंद पालवे, अमलदार अविनाश दराडे,अतुल जाधव,अंकुश दळवी यांनी केली असून पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सदर कामगिरी बाबत 15000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News