दौंड शहरात विनापरवाना चोरून गुटका व विदेशी सिगारेट साठवण करून विकणाऱ्या व्यापाऱ्यावर मोठी कारवाई.. तब्बल 7 लाख रुपये किंमतीचा माल केला जप्‍त


दौंड शहरात  विनापरवाना चोरून गुटका व विदेशी सिगारेट साठवण करून विकणाऱ्या व्यापाऱ्यावर  मोठी कारवाई.. तब्बल 7 लाख रुपये किंमतीचा माल केला जप्‍त

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दारू,वाळू,गुटखा असे अवैध धंदे करणाऱ्यांना दौंड पोलीस स्टेशनचे प्रो पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांची चपराक,   दिनांक 19.4. 2021 रोजी पोलिस उप-अधीक्षक श्री मयूर भुजबळ पोलीस स्टेशन येथे हजर असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की दौंड शहरामध्ये इसम नामे कमलेश मुरली कृपलानी राहणार भैरोबा मंदिर जवळ दौंड यांनी आपल्या राहत्या घराच्या बाजूला असलेल्या गांळ्यामध्ये अवैधरित्या विनापरवाना गुटका व विदेशी सिगारेट असा माल साठवण करून त्याची आपल्या ओळखीच्या लोकांना चोरून विक्री करत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळताच त्यांनी लागलीच एक टीम तयार करून सदर ठिकाणी छापा घातला असता तेथे तब्बल सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदर इसमावर भा द वि कलम 188,269,272,273, सह अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम तसेच सिगारेट व तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण) या अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे करत आहेत.

सदरची कारवाई 

माननीय पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते , उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड अमृत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परि पोलीस उप अधीक्षक मयूर भुजबळ सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी  पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे,विजय वाघमारे,अंमलदार शरद वारे, विशाल जावळे, किरण ढुके, जब्बार सय्यद,योगेश गोलांडे, आप्पा वाकळे यांनी केली*

जाहिरात
Search
विडिओ
Recent News