माजी आमदार ज्ञानेश्वर सह. साखर कारखान्याचे चेअरमन यांच्याकडून स्व. मारुतराव घुले मंगल कार्यालयात सुस्सज कोव्हीड विलगीकरण कक्ष


माजी आमदार ज्ञानेश्वर सह. साखर कारखान्याचे चेअरमन यांच्याकडून  स्व. मारुतराव घुले मंगल कार्यालयात सुस्सज कोव्हीड विलगीकरण कक्ष

शेवगाव प्रतिनिधी, सज्जाद पठाण: शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील कोरोनाबधित नागरिकांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मा.आ.नरेंद्रजी घुले पाटील व मा.आ.चंद्रशेखरजी घुले पाटील यांच्या प्रयत्नांतून शेवगाव येथे १०० बेडस् चे सोयीयुक्त सुसज्ज असे "कोविड केअर सेंटर" लवकरच रुग्णांच्या सेवेकरता उपलब्ध होत आहे.त्याची पाहणी काल 

मा.आ.नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांनी प्रत्यक्षस्थळी जाऊन तेथील सोयी-सुविधांच्या तयारीचा आढावा घेतला.यावेळी त्यांच्या सोबत कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे व मारॆक कमिटीचे पदाधिकारी व संचालक होते आपण ज्या समाजात जन्माला आलो त्याचे काहीतरी देणे लागतो या म्हणी प्रमाणे समाजातील तळागाळातील लोकांसाठी ज्यांना नगर पुण्याला जाणे शक्य नाही खासगी हॉस्पिटल चा खर्च परवडत नाही त्यांना मदतीचा हात मिळावा या उदात्त हेतुने  येत्या काही दिवसात शेवगांव शहरातील मार्केट यार्ड मधील मंगल कार्यलयात सुमारे शंभर खाटांचे तात्पुरते रुग्णालय तालुकयातील रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे 

ताजा कलम

सध्याचे तालुक्याचे लोक प्रतिनिधी हाताची घडी घालुन लांबून गंम्मत पाहत आहेत त्या पार्श्व भुमीवर  घुले बंधुनी केलेल्या प्रयत्नांचे सर्वसामान्य शेवगावकरांनी निश्चिती अभिनंदन केले आहे

अविनाश देशमुख ,सामाजिक कार्यकर्ते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News