दौंडच्या स्मशानभूमीत परिस्थिती बिकट,ओट्याच्या खाली करावे लागतायेत अंत्यविधी, मृतदेह अर्धवट स्थितीत


दौंडच्या स्मशानभूमीत परिस्थिती बिकट,ओट्याच्या खाली करावे लागतायेत अंत्यविधी, मृतदेह अर्धवट स्थितीत

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

कोरोनाच्या जागतिक महा मारीने सर्वत्रच हाहाकार केला आहे त्यामध्ये दौंड शहर आणि तालुक्यातही वाईट परिस्थिती आहे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे, दौंड शहरातील भीमा नदी तीरावरील स्मशानभूमी मध्ये आज परिस्थिती गंभीर झाल्याचे पाहायला मिळाले ओटयावरील लोखंडी बॅरिकेट्स मधील पाचही ठिकाणी मृतदेह जळत  असल्यामुळे इतर चार मृतदेह ओट्या च्याखली घ्यावे लागले आणि एक येण्याच्या मार्गावर होता ओट्याच्या खाली केलेल्या अंत्यविधी मधील दोन मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होते त्या वेळी तेथे अंत्यविधीसाठी आलेल्या तरुणांनी खंत व्यक्त केली या ठिकाणी लक्ष देण्यासाठी कोणीच नाही इथे देखरेख ठेवण्यासाठी असलेल्या व्यक्तीने रजिस्टर         मध्ये मृतदेह कोणाचा आहे त्यांचे नाव,गावाचे नाव,नातेवाईकांचे नाव व मोबाईल नंबर  नोंदणी करून मृत व्यक्तीच्या घरातील कोणाचातरी मोबाईल घेऊन संपर्कात राहणे गरजेचे आहे असे अर्धवट जळालेला मृतदेहाची अवहेलना होऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे सदर व्यक्तीच्या नातेवाईकांना फोन करून त्यावर अजून लाकडे टाकून तो मृतदेह पूर्णपणे जळाला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे, दिवसभरात आठ ते नऊ मृतदेह तेथे जळत होते परंतु त्या ठिकाणी देखरेखीसाठी कोणीही नव्हते मोकाट कुत्री मशानभुमी मध्ये भटकत असल्याचे त्या तरुणांनी निदर्शनास आणून दिले, कोरोना मुळे होत असलेला विना नातेवाईक अंत्यविधी आणि त्यानंतर होत असलेली  अवहेलना ही गंभीर बाब असल्याचे तरुणांनी सांगितले, वयस्कर व्यक्ती पेक्षा जास्त तरुणच कोरोनाच्या विळख्यात  सापडत असल्याचे चित्र दिसत आहे,त्यामुळे सर्वांनीच आपापली काळजी घ्यावी,फालतू आत्मविश्वास न दाखवता,पोलीस,आरोग्य विभाग, नगरपालिका, जिल्हाधिकारी, यांनी दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वांनी मिळून घेणे गरजेचे आहे असे आवाहन महाराष्ट्र भुमी मराठी न्यूज चॅनल तर्फे करण्यात आले आहे, नगरपालिका प्रशासन यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन पुढील होणारा अनर्थ टाळावा असेही या तरुणांनी यावेळी बोलून दाखवले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News