द्रवरूपी वैद्यकीय ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी रेल्वे पूर्णपणे सज्ज


द्रवरूपी वैद्यकीय  ऑक्सिजन  आणि ऑक्सिजन सिलिंडरची  वाहतूक करण्यासाठी रेल्वे पूर्णपणे सज्ज

ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्यासाठी रेल्वे सज्ज

ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांच्या वेगवान वाहतुकीसाठी  ग्रीन कॉरिडोर

तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर द्रवरूपी वैद्यकीय  ऑक्सिजन टँकर्स लोड करण्यासाठी मुंबई आणि आसपासच्या  कळंबोली / बोईसर, रेल्वे स्थानकांमधून रिकामे टँकर्स हलवण्यात येतील आणि विशाखापट्टणम  आणि जमशेदपूर / रुरकेला  / बोकारो येथे पाठवले जातील

महत्त्वाच्या मार्गिकांवर द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू अर्थात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन  आणि ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी रेल्वे पूर्णपणे सज्ज झाली आहे.

कोविड संसर्गाच्या गंभीर वैद्यकीय परिस्थितींमध्ये उपचारांसाठी ऑक्सिजनची उपलब्धता हा  एक महत्त्वपूर्ण घटक  आहे.

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सरकारने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकर्स रेल्वेने नेता येऊ  शकतील  का याची चाचपणी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी  संपर्क साधला होता.

रेल्वेने  लिक्विड मेडिकल ऑक्सिजन वाहतुकीची तातडीने तांत्रिक व्यवहार्यता तपासली.  फ्लॅट वॅगन्सवर ठेवलेल्या रोड टँकरसह रोल ऑन रोल ऑफ (रोरो ) सेवेद्वारे एलएमओची वाहतूक करावी लागेल.

काही ठिकाणी पुलांवरील रस्ते  (आरओबी) आणि ओव्हर हेड इक्विपमेंट्स (ओएचई) च्या उंचीच्या निर्बंधांमुळे विविध आकाराच्या रस्ते टँकरपैकी 3320 एमएम उंची असलेले रोड टँकर टी 1618 चे मॉडेल 1290 मिमी उंची असलेल्या फ्लॅट  वॅगन (डीबीकेएम) वर ठेवता येतील.

वाहतुकीच्या मापदंडांची चाचणी  सुनिश्चित करण्यासाठीविविध ठिकाणी चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

या डीबीकेएम वॅगन्स 15.04.2021  रोजी मुंबईतील कळंबोली इथल्या  शेडमध्ये  ठेवण्यात आल्या होत्या आणि एलएमओ भरलेला टी 1618  टँकरही येथे आणण्यात आला  होता. उद्योग आणि रेल्वेच्या प्रतिनिधींनी संयुक्तपणे  मोजमाप घेतली.

या मोजमापाच्या आधारेमार्गाबाबत मंजुरी घेण्यात आली  आणि ओव्हरहेड क्लीयरन्सनुसार  काही मार्गांवर वेगावर  मर्यादा घालून रोरो वाहतूक करणे शक्य  होईल असे आढळले.

क्रायोजेनिक टँकरमध्ये एलएमओच्या रोरो वाहतुकीसाठी व्यावसायिक आरक्षण  आणि मालवाहतुकीचे पैसे देण्याबाबत  रेल्वे मंत्रालयाने 16.04.2021 रोजी एक परिपत्रक जारी केले असून यासंदर्भात सर्व आवश्यक तपशील दिला आहे आणि मार्गदर्शन केले आहे.  परिपत्रकाची प्रत सोबत जोडली आहे.

17.04.2021  रोजी रेल्वे बोर्डाचे अधिकारी आणि राज्य परिवहन आयुक्त आणि उद्योग प्रतिनिधी यांच्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या वाहतुकीशी संबंधित समस्या  या विषयावर बैठक झाली.

महाराष्ट्र परिवहन आयुक्त यांच्यामार्फत टँकरचे आयोजन केले जाईल असा निर्णय घेण्यात आला. हे रिकामे टँकर मुंबई व आसपासच्या  कळंबोली / बोईसररेल्वे स्थानकांमधून हलवले जातील आणि तेथून द्रवरुपी  वैद्यकीय ऑक्सिजन टँकर लोड करण्यासाठी विशाखापट्टणम  आणि जमशेदपूर / रुरकेला  / बोकारो येथे पाठवले जातील.

वरील निर्णयाच्या अनुषंगाने विभागीय  रेल्वेला ट्रेलर घेण्याची व ते पुन्हा लोड  करण्यासंदर्भात सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशाखापट्टणम ,  अंगुल आणि भिलाई येथे रॅम्प बांधावे लागतील आणि कळंबोली येथील विद्यमान रॅम्प आणखी मजबूत करावे लागेल.  19.04.2021 पर्यंत कळंबोली रॅम्प तयार होईल. टँकर प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोचेपर्यंत  रॅम्प्सचे कामही दोन तीन  दिवसात पूर्ण होईल.

18.04.2021 रोजी बोईसर (पश्चिम रेल्वे) येथे एक चाचणी आयोजित केली होती ज्यात  एक लोडेड  टँकर एका फ्लॅट डीबीकेएमवर ठेवला होता आणि सर्व आवश्यक मोजमापे  घेतली गेली.

विविध  ठिकाणी टँकर हलविण्याच्या दृष्टीने  रेल्वेने कळंबोली आणि अन्य  ठिकाणी डीबीकेएम वॅगन यापूर्वीच तयार ठेवल्या आहेत. टँकर हलवण्यासाठी रेल्वे महाराष्ट्राकडून सूचना मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.

19.04.2021 रोजी 10 रिकामे टँकर पाठवण्यासाठी तात्पुरता वाहतूक आराखडा  तयार करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या परिवहन सचिवानी  19.04.2021 पर्यंत टँकर्स  पुरवण्याचे आश्वासन दिले आहे.राज्य सरकारच्या मागण्यांबाबत विभागीय रेल्वेला कळविण्यात आले आहे. सीएफटीएम आणि पीसीओएम हे उद्योग क्षेत्र आणि राज्य सरकारांच्या संपर्कात आहेत. रेल्वे बोर्डाने संबंधित महाव्यवस्थापकांना पूर्णपणे सज्ज राहण्याचे आणि  रेल्वेद्वारे ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी राज्य व केंद्र सरकारच्या संस्थाना सक्रिय सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच रेल्वे बोर्डामध्ये ईडी / टीटी / एफ यांना नोडल अधिकारी  म्हणून नेमले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News