दौंडच्या ग्रामीण भागात कोरोना चा उद्रेक एका दिवसात 317 रुग्ण, वरवंड,कूरकुंभ पाटस हॉटस्पॉट वर


दौंडच्या ग्रामीण भागात कोरोना चा उद्रेक एका दिवसात 317 रुग्ण, वरवंड,कूरकुंभ पाटस हॉटस्पॉट वर

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना चा उद्रेक वाढत चालला आहे, रुग्ण वाढणे ही चिंतेची बाब असून काळजी घेणे हाच यावर सर्वोत्तम उपाय आहे, मार्च महिन्यातील दौंड तालुक्याचा आकडा 50 आसपास होता परंतु 41रुग्ण एकट्या वरवंड गावात सापडले असल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे, हॉट स्पॉट वरील गावे वरवंड 41, कूरकुंभ 25, पाटस 23, केडगाव 14,आलेगाव 14, कानगाव 10 या गावांमध्ये रुग्ण वाढत चालले आहेत,आणि सरकारी आणि खाजगी दोन्ही दवाखान्यांमध्ये बेड कमतरता निर्माण झाली आहे, दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात शनिवार दिनांक 16/4/21 रोजी 263 रुग्ण सापडले असल्याची माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ यांनी दिली आहे, दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे 54 रुग्ण सापडल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी सांगितली आहे, लोकांमध्ये बेफिकिरी वाढल्यामुळे को रोणाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे यासाठी आपले कुटुंब आपणच सांभाळणे गरजेचे आहे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे मास्क वापरणे हात स्वच्छ धुणे, सर्दी खोकला अगर इतर काही त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे ही काळाची गरज आहे कोणताही आजार लपवू नये,सल्ला घेऊन त्यावर उपचार घेणे गरजेचे आहे असे डॉक्टर सुरेखा पोळ यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News