पळशीत तलावातील गाळउपसा काम सुरू


पळशीत तलावातील गाळउपसा काम सुरू

बारामती : प्रतिनिधी  (काशिनाथ पिंगळे)

पळशी (ता.बारामती) याठिकाणी रेलफोर फाउंडेशनच्या सहकार्याने महानवरकीच्या तलावातील गाळ उपस्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे. 

   या गाळ उपशाच्या कामाचा शुभारंभ पाणी फाऊंडेशनचे बारामती तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड व पळशीचे सरपंच बाबासाहेब चोरमले यांच्या हस्ते करण्यात आला. 

 रेल्फोर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक नथाने, नितीन घोडके यांच्या सहकार्यातून हे काम सुरू करण्यात आले आहे.

  बारामती तालुक्यातील पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या गावांमध्ये काही ना काही कामे सुरु आहेत. पावसाळ्यापूर्वी अनेक कामे करून जास्तीत जास्त पाणी अडविण्याचे काम केले जाते. त्यापैकीच पळशी येथील तलावातील गाळ उपसा काम सुरू करण्यात आले आहे.

   यावेळी महेश यादव, सदस्य हिरामण गडदरे, पत्रकार काशिनाथ पिंगळे, शंकर माने, उत्तम करे इत्यादी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News