शेवगाव पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या मीराताई लांडे यांचे निधन


शेवगाव पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या मीराताई लांडे यांचे निधन

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

शेवगाव पंचायत समितीच्या सदस्या मिराताई लांडे वय - ६२ यांचे नुकतेच दुख:द निधन झाले. त्या पाच दिवसापासून आजारी होत्या

   ‌‌त्यांच्यावर नगर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार चालू होते. अचानक निधन झाल्याची वार्ता तालुक्यात वा-यासारखी पसरली. कार्यकर्त्यांनी शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथील त्यांच्या घराकडे धाव घेवून हळहळ व्यक्त केली जात होती. त्यांच्या मागे पती, मुलगा, सुन, तीन मुली, जावई असा परिवार आहे. स्व. मारूतराव घुले पाटील यांचे अत्यंत विश्वासू राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते दिलीपराव लांडे पाटील यांच्या सौभाग्यवती होत्या. जोहरापूर ग्रामपंचायत उपसरपंच रोहन लांडे यांच्या आई होत्या,

        त्यांनी आजपर्यंत विविध पदावर काम केले, त्यांची राजकीय सुरुवात जोहरापूर ग्रामपंचायत पासून होऊन त्या जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समिती अहमदनगर च्या सभापती राहिल्या, सध्या त्या पंचायत समितीच्या भातकुडगाव गणाच्या विद्यमान सदस्या होत्या,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News