प्राथमिक शिक्षकां ची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद तुती असल्याचे मत पंचायत समितीचे सभापती घुले यांनी व्यक्त केले आहे


प्राथमिक शिक्षकां ची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद तुती असल्याचे मत पंचायत समितीचे सभापती घुले यांनी व्यक्त केले आहे

शेवगाव प्रतिनिध सज्जाद पठाण कोरोनाच्या दुस-या लाटेच्या संकटात तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी मानवता दृष्टीकोनाने कोव्हिड सेंटरसाठी गेल्या चार दिवसांत रविवार पर्यंत ( दि. १८ ) सुमारे स्वयंप्रेरणेने पाच लाख रूपयांचा भरीव निधी संकलित करून आदर्शवत कार्य केले आहे. रूग्णांना दिलासा देण्यासाठी प्राथमिक शिक्षकांची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद व स्तुत्य असल्याचे मत पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले पाटील यांनी व्यक्त केले.

शेवगाव तालुक्यात रूग्ण संख्या वाढत असताना गोरगरिब रूग्णांना व गंभीर रूग्णांना शेवगावच्या कोव्हिड सेंटर मध्ये उपचार दिले जात आहे. उपचाराच्या विविध उपाययोजना करताना अडचणी येत असल्याचे लक्षात घेता तहसिलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके , नोडल अधिकारी शैलजा राऊळ यांनी मदतीचे दानशूरांना आवाहन केले होते.  त्याला प्राथमिक शिक्षकांनी प्रतिसाद देत गुरूवारी ( दि. १५ ) पासून प्राथमिक शिक्षकांनी स्वेच्छेने मदतनिधी जमा करण्यास सुरूवात केली. व्हॉट्स अपद्वारे केलेल्या आवाहनास तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला.  शेवगावच्या उपक्रमाचे गुरूकूलचे शिक्षकनेते डॉ. संजय कळमकर, शिक्षक परिषद तथा गुरूमाऊली मंडळाचे नेते रावसाहेब रोहकले, शिक्षकनेते राजेंद्र जायभाये,  सदिच्छाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत, शिक्षक संघाचे नेते राजू शिंदे , अनिल आंधळे, सचिन नाब्दे आदींनी स्वागत केले. राज्यातील शिक्षक कोरोना संकट काळात सामाजिक उत्तरदायित्व निभावत असून शेवगावमधील हा उपक्रम जिल्हा व राज्याला मार्गदर्शक असल्याची प्रतिक्रिया अॅक्टिव्ह टिचर्स फोरमचे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केली आहे.  

चौकट - जि. प. अध्यक्षा राजश्री घुले, पं. स.  सभापती डॉ. क्षितीज घुले  यांच्या सहकार्याने शेवगाव तालुका शैक्षणिक गुणवत्तेत अग्रस्थानी आहे. प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक कामकाज, शिष्यवृत्ती परीक्षा, स्वाध्याय व ऑनलाईन शिक्षणातही काम अतिशय चांगले आहे. कोरोना संकटात सामाजिक बांधिलकीच्या भावनेने प्राथमिक शिक्षकांनी स्वेच्छेने कोव्हिड सेंटरसाठी भरीव मदतनीधी जमा करून आदर्शवत काम केले आहे.  या पवित्र कार्याला मी पाच हजार एक रूपयांची मदत केली आहे. 

यथाशक्ती प्रमाणे सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षक यांनी  मदत करावी - रामनाथ कराड, गटशिक्षणाधिकारी , शेवगाव

जाहिरात
Search
विडिओ
Recent News