सायंबाच्यावाडीत ग्रामस्थांना वाफेच्या मशीनचे वाटप


सायंबाच्यावाडीत ग्रामस्थांना वाफेच्या मशीनचे वाटप

बारामती : प्रतिनिधी  (काशिनाथ पिंगळे)

स्व. तुकाराम आप्पा भापकर फाउंडेशन यांच्या सहकार्यातून सायंबाचीवाडी गावातील सर्व ग्रामस्थांना "वाफेच्या मशीन" चे वाटप सायंबाच्यावाडीचे उपसरपंच प्रमोद जगताप व पंचायत समिती सदस्य राहुल भापकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 

 सायंबाच्यावाडीतील सर्व कुटुंबीयांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मशीनचे वाटप करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दुर्योधन भापकर यांनी दिली. यावेळी मनोहर भापकर, शरद भापकर, गणेश भापकर, अंकुश मदने, घाडगे भाऊसाहेब, कांबळे नाना, भगत नाना, रामदास भापकर, बाळासाहेब झणझणे, पोपट भापकर ई. उपस्थित होते. याबद्दल स्व. तुकाराम आप्पा भापकर फाउंडेशनचे ग्रामपंचायत सायंबाचीवाडीच्या वतीने आभार मानण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News