नगर शहराला ऑक्सिजन द्या...रेमडेसिव्हर वितरणात राजकीय हस्तक्षेप नको!! शिवसेना नेते विक्रम राठोड यांची पालकमंत्र्याकडे मागणी


नगर शहराला ऑक्सिजन द्या...रेमडेसिव्हर वितरणात राजकीय हस्तक्षेप नको!! शिवसेना नेते विक्रम राठोड यांची पालकमंत्र्याकडे मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) : नगर शहरासह जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या समस्येकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधत नगरला तातडीने ऑक्सिजन द्या अशा मागणीचे पत्र सेना नेते विक्रम अनिलभैय्या राठोड यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ याना दिले आहे.  *रेम डेसिव्हर इंजेक्शनचे वाटप करताना राजकीय हस्तक्षेप होत असून त्या दबावाखाली प्रशासन या इंजेक्शनचे वाटप करीत आहे*. हे प्रकार थांबविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

       नगर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती खूपच भयावह होते आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्नांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आणि या रोगाची लागण झाल्यानंतर मृत्युमुखी पडणाऱ्या मृतांची संख्या देखील लक्षणीय आहे. *रुग्णांना वेळेवर बेड न मिळणे, ऑक्सिजन संपलेला असणे , व्हेंटिलेटर उपलब्ध नसणे , रेम डेसिव्हर इंजेक्शन वेळेवर न मिळणे ही त्यामागची मुख्य कारणे आहेत*.  आरोग्य अ सुविधें मुळे कोणाचाही बळी जाता कामा नये यासाठी नगर शहर शिवसेनेने ९४२२२२१६०८ हा मोबाईल नंबर चोवीस तास सुरु ठेवला असून कोणत्याही वैद्यकीय मदतीसाठी नगरकरांनी या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन विक्रम राठोड यांनी केले आहे. नगर जिल्ह्यात कोरोना काळातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ व राज्याचे महासुल मंत्री बाळासाहेब थोरात हे नगरला आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी नियोजन आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर नगरची वास्तविक परिस्थिती मंत्र्याच्या नजरेस आणून देण्यासाठी विक्रम अनिल भैय्या राठोड यांनी पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांची भेट घेतली . त्यांना निवेदन दिले . कोरोनामुळे उध्दभवलेल्या परिस्थितीचे आणि सुरु असलेल्या मृत्यू तांडवाच्या वास्तवाची जाणीव त्यांनी चर्चेतून करून दिली .  यावेळी आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिकाताई राजळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, मंदार मुळे, मनोज चव्हाण उपस्थित होते. 

     यावेळी पालकमंत्री यांनी हे निवेदन स्वीकारून शासन उचलत असलेल्या पावलांबाबत सेना शिष्टमंडळाशी चर्चा केली . पण परिस्तिथी का हाताबाहेर गेली याबाबत तक्रारींचा पाढाच राठोड यांनी वाचून दाखवला . 

*जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. रेम डेसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे*. वैद्यकीय सुविधाची वाणवा आ हे. रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक २४X७ कंट्रोल रूम सुरु करण्यात आली याबद्दल राठोड यांनी आनंद व्यक्त केला . मात्र या *कंट्रोल रूम चा फोन वेळेवर उचलला जात नाही.* *बरेचदा ०२४१-२३२२४३२ हा नंबर लागत नाही* . सध्या कोठे बेड उपलब्ध आहे व्हेंटिलेटर मिळेल का याची माहीती ऑनलाईन वेबसाइटर  दिली जात नाही. *रेम डेसिव्हर इंजेक्शन चेहरा पाहून दिले जाते आहे*. त्याचे वितरण करतांना राजकीय हस्तक्षेप करण्यात येतो आहे. *ऑक्सिजन सिलेंडरचे वितरण करतांना आप दुजाभाव केला जातो आहे*.  त्यामुळे रुग्नाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत जाऊन मृतांचा आकडा वाढतो आहे. 

या परिस्थितीत लवकरात लवकर सुधारणा करावी अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे आहेत . तसे जर झाल्यास नगरच्या उध्वस्त आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र जगासमोर येईल आणि याला कारणीभूत असणाऱ्यांची नगर शहर शिवसेना गय करणार नाही असा इशारा विक्रम अनिल राठोड यांनी दिला आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News