देवटाकळी चे दत्तात्रय जाधव बेपत्ता!! शेवगांव पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल


देवटाकळी चे दत्तात्रय जाधव बेपत्ता!! शेवगांव पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

शेवगांव तालुक्यातील देवटाकळी येथील दत्तात्रय राणू जाधव ( वय - ५८ ) हे दि.२६ मार्चला रात्री ८:३० च्या सुमारास राहत्या घरून कुणाला काही एक न सांगता निघुन गेले आहेत. ते अद्याप पावेतो घरी आले नाही.म्हणून शेवगांव पोलीस स्टेशनला बेपत्ता असल्याची खबर सचिन जाधव यांनी दिली.

सचिन जाधव यांनी शेवगांव पोलीस स्टेशनला हजर होवुन खबर लिहुन दिली की, शेवगांव तालुक्यातील देवटाकळी येथे माझ्या कुटुंबात आई - संगिता, वडील दत्तात्रय व भाऊ - वरुन असे आम्ही एकत्र रहावयास आहोत. मी औरंगाबाद येथे खाजगी नोकरी करुन कुटुंबाचा उदर्निवाह चालवितो. माझे वडील दत्तात्रय यांना दारु पिण्याचे व्यसन असुन ते नेहमी दारु पितात. ते दारु पिण्यासाठी भातकुडगाव फाटा , तसेच कुकाणा येथे जात असतात. दिनांक २८ मार्च रोजी माझा भाऊ वरुन याचा फोन आला. त्याने सांगितले की, दोन दिवसापासून आपले वडील दत्तात्रय जाधव हे  कुणाला काही एक न सांगता निघुन गेले आहेत. ते अद्याप पावेतो घरी आले नाही.असे कळविल्याने मी गावी देवटाकळी येथे आलो. आम्ही आज रोजी पावेतो वडीलांचा नातेवाईकांकडे, इतर संभाव्य ठिकाणी शोध घेतला असता त्यांचेबाबत काही एक माहीती मिळुन आली नाही. पोलीस स्टेशनला खबर देण्यात आली.

दत्तात्रय जाधव यांचे वर्णन पुढील प्रमाणे 

नाव- दत्तात्रय राणुजी जाधव, वय -५८ वर्ष, पत्ता- रा. देवटाकळी ता.शेवगाव, अंगात - पांढरा तिन बटणाचा शर्ट, व पायजमा, केस - पांढरे, पायात - काळे रंगाची परेगॉन चप्पल, रंग - गोरा, चेहरा - गोल,  बांधा - मध्यम, उंची -५ फुट ७ इंच असे वर्णन असलेल्या व्यक्तीबाबत  शेवगांव पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. २३/ २०२१ नुसार मिसिंग दाखल आहे. पुढील तपास पो.हे.काँ. भाऊसाहेब गिरी करत आहे. या व्यक्तीबाबत कुणाला काही माहीत असल्यास व ही व्यक्ती कुणाला आढळून आल्यास शेवगांव पोलीस स्टेशन फोन नंबर - ०२४२९२२१२३३ किंवा तपासी अधिकारी पो.हे.काँ.भाऊसाहेब गिरी मो. ९५५२६४०६३० वर संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पोलिसांनी तपास करावा - जाधव

माझे वडील दत्तात्रय जाधव यापूर्वी दोनवेळेस असेच न सांगता घरातून निघून गेले होते. परंतु प्रत्येक वेळी चार पाच दिवसाने पुन्हा घरी येत होते. यावेळी मात्र २३ दिवस झाले तरी अद्याप घरी आले नाही किंवा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने माझ्या वडीलांचा तपास लावून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. अशी विनंती सचिन जाधव यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News