दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर मयूर भुजबळ पोलीस उपअधीक्षक यांची मोठी कारवाई, 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल केला नष्ट.


दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर मयूर भुजबळ पोलीस उपअधीक्षक यांची मोठी कारवाई, 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल केला नष्ट.

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

प्रोफेशनरी पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांनी दौंड पोलीस स्टेशनला चार्ज घेतल्यानंतर अवैध वाळू,अवैध दारूधंदे  यांच्यावर कारवाईचा धडाका लावला होता हे काम करत असताना त्यांनाही कोरोना संसर्ग  झाल्यामुळे ते सुट्टीवर होते कोरोना चा  कालावधी संपल्यानंतर ड्युटीवर हजर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अवैध दारू धंद्यावर कारवाई करून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली आहे,

दिनांक 15.4.2021 रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे पोलीस उपअधीक्षक श्री मयुर भुजबळ त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की मौजे मलठण गावचे हद्दीत इसम नामे  निलेश लोंढे राहणार मलठण तालुका दौंड जिल्हा पुणे व त्याचा साथीदार नाव पत्ता माहीत नाही  हे बेकायदेशीर विनापरवाना गावठी हातभट्टी दारू तयार करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळताच श्री मयूर भुजबळ  हे स्वतः टीम सोबत सदर ठिकाणी जाऊन  हातभट्टी यांवर छापा टाकला असता तेथे सुमारे 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारी साधने मिळून आली त्यात गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन अंदाजे 4 हजार लिटर 20 प्लास्टिकचे ड्रम 1 मोठी लोखंडाचे ड्रम व इतर दारू काढण्यासाठी लागणारी साधने मिळून आले ते साधने सदर  पोलीस टीम ने जागीच नष्ट केली व सदर दोन्ही आरोपी  विरुद्ध  महाराष्ट्र दारूबंदी कायदा  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास बीट आमदार सहाय्यक फौजदार संतोष शिंदे हे करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते , उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड अमृत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परि पोलीस उप अधीक्षक मयूर भुजबळ,पोलीस अंमलदार विशाल जावळे, किरण ढुके, करमचंद बंडगर, योगेश कर्चे, डी व्ही ढोले यांनी केली 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News