ऑक्सिजनचा देशभरात पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधानांनी घेतला वैद्यकीय ऑक्सिजनच्या सद्यस्थितीचा आढावा


ऑक्सिजनचा देशभरात पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधानांनी घेतला वैद्यकीय ऑक्सिजनच्या सद्यस्थितीचा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. आरोग्यउद्योग प्रोत्साहन आणि आणि अंतर्गत व्यापार विभागपोलादरस्ते वाहतूक अशा सर्व विभागांकडून देशातल्या ऑक्सिजनच्या स्थितीविषयी त्यांनी माहिती घेतली. या स्थितीतसर्व मंत्रालये आणि राज्य सरकारांमध्ये समन्वय असणे अत्यंत महत्वाचे आहेयावर पंतप्रधानांनी यावेळी भर दिला.

तसेच सध्या देशभरात होत असलेल्या ऑक्सिजन पुरवठ्याविषयी आणि येत्या 15 दिवसांत कोविड रुग्णसंख्या अधिक असलेल्या 12 राज्यांत किती ऑक्सिजन लागू शकेलया विषयीही पंतप्रधानांनी विस्तृत आढावा घेतला. महाराष्ट्रमध्यप्रदेशगुजरातउत्तरप्रदेशदिल्लीछत्तिसगढकर्नाटककेरळतामिळनाडूपंजाबहरियाणा आणि राजस्थान या राज्यात सध्या कोविडची रुग्ण संख्या अधिक आहे. या सर्व राज्यांमधील जिल्हानिहाय स्थितीचे सादरीकरण यावेळी पंतप्रधानांसमोर करण्यात आले.

केंद्र आणि राज्य सरकारे एकमेकांच्या सतत संपर्कात असून20 एप्रिल25 तसेच 30 एप्रिल रोजी देशात ऑक्सिजनची अंदाजे किती मागणी असू शकेलयाची माहिती सर्व राज्यांना देण्यात आली आहेअसे पंतप्रधानांना यावेळी सांगण्यात आले. त्यानुसारया तीन तारखांना अनुक्रमे4,880 मेट्रिक टन5,619 मेट्रिक टन आणि 6,593 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडू शकेल.

देशात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेताती पूर्ण करण्यासाठीऑक्सिजन निर्मितीची क्षमतेविषयी देखील पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. प्रत्येक प्रकल्पाच्या सध्याच्या ऑक्सिजन निर्मिती क्षमतेत वाढ करावीअशी सूचना त्यांनी यावेळी दिली. तसेचपोलाद निर्मिती प्रकल्पांमध्ये असलेला अतिरिक्त ऑक्सिजन साठा देखील वैद्यकीय उपयोगासाठी वापरला जावायावरही या बैठकीत चर्चा झाली.

तसेच ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणाऱ्या वाहनांची वाहतूक विना-अडथळा व्हावीहे सुनिश्चित कराअसे निर्देशही पंतप्रधानांनी दिले. सिलेंडर घेऊन जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक जलद आणि विनासायास व्हावीयासाठी केंद्र सरकराने या गाड्यांना परवाना नोंदणीतून सवलत दिली आहे. वाढीव मागणीनुसारआवश्यक तेवढा ऑक्सिजन वेळेत गरजूंपर्यंत पोचावा यासाठी या  सर्व टँकर्सची वाहतूक 24 तास सुरु राहील अशी व्यवस्था करण्याचे निर्देश सर्व राज्ये आणि वाहतूकदारांना दिले आहेतअशी माहिती पंतप्रधानांना यावेळी देण्यात आली.

ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची केंद्रे देखील 24 तास सुरु राहणार असून आवश्यक त्या सुरक्षा उपायांसह ती कार्यरत असतील. काही आवश्यक शुद्धीकरण प्रक्रियेनंतरऔद्योगिक वापरासाठीचा ऑक्सिजन वैद्यकीय कामांसाठी वापरण्याची परवानगी देखील केंद्र सरकारने दिली आहे. त्याचप्रमाणेनायट्रोजन आणि अर्गोन टँकर्स देखील गरजेनुसार ऑक्सिजन टँकर्समध्ये परिवर्तीत करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनची आयात करण्याचे प्रयत्न देखील सुरु असल्याचे सबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी पंतप्रधानांना सांगितले.

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News