कोरोनाला संपविण्यासाठी जनतेला आवाहन :सामाजिक कार्यकर्ते मंगेश रायकर


कोरोनाला संपविण्यासाठी जनतेला आवाहन :सामाजिक कार्यकर्ते मंगेश रायकर

सुरेश बागल कुरकुंभ:प्रतिनिधी

श्री.मंगेश राजाराम रायकर महात्मा फुले समता परिषद तालुका दौंड कार्यकारी अध्यक्ष पदावर कार्यरत असुन गेले एक वर्षाहुन अधिक काळ कोरोना सांसर्गिक महा मारीत कोरोना बाधीत रुग्नांना सामाजिक भान बाळगत कृतीबद्ध मदत करत आहे. गेल्या वर्षभरात १००हुन अधिक कोरोना लागण झालेल्या रुग्नांना स्वःताच्या दुचाकी,चारचाकी वाहनातुन आवश्यक त्या दवाखान्यात नेण्याचे काम केले.                                               महिन्याभरापुर्वी दाखल झालेल्या कोरोना दुसय्रा लाटेत देखील गरजु रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे,इंजेक्शन मिळवुन देणे. बाधीत व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाणे,मानसिक आधार देणे आदी कामे करत आहे.                                                               समाजमन मोठ्या प्रमाणात घाबरलेले असताना पुढे येऊन कृतीशील तत्परता दाखवत असताना मला एक वेगळाच  अनुभव येतो आहे. मी ज्या ज्या माणसाककडे जात आहे ती माणसं नेहमी प्रमाणामध्ये न बोलत टाळत आहे. तू कोरोना रुग्नांबरोबर असतो तुझ्यामुळे आम्हाला लागण होईल.                       

स्वता गरजूंना मदत करत नाही अन् दुसय्राचे मनोबल खच्ची करायचं काम करतात परंतु त्यांच्यावर मी रागावणार नाही. स्वतः माझी काळजी घेऊन हे काम करत आहेत. जर हे काम डॉक्टर किंवा सामाजिक कार्यकर्ते करत असतील तर बाकीच्या लोकांनी त्यांना साथ दिली पाहिजे परंतु काही विघ्नसंतोषी माणस कोरोनायोद्धा यांना वाळीत टाकण्याची बेजबाबदार कृती करत आहे.त्यांचा तिरस्कार करू नका.स्वतः सावित्रीबाईंनी प्लेगच्या रुग्णांना दवाखान्यात न्यायचं काम केलं होतं त्यामध्ये अगणित त्रास सहन करावा लागला.परंतु त्या मागे हटल्या नाहीत आम्ही त्यांचे चार-आचार प्रमाण मानुन चालत आहोत.                                           येत्या काळात आपल्याला सुबुद्धी मिळो याविषयी आश्वस्त आहोत. कोरोनाला घाबरू नका ,सतर्क रहा, सोशल डिस्टनसींग पाळा सरकारला सहकार्य करा असासंदेश सामाजिक कार्यकर्ते मंगेश रायकर यांनी जनतेला दिला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News