तहसिलदार पवार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितिन खामकर यांनी श्रीगोंद्यातील मेडिकल स्टोअरची अचानक भेट देऊन तपासणी केली


तहसिलदार पवार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितिन खामकर यांनी श्रीगोंद्यातील मेडिकल स्टोअरची अचानक भेट देऊन तपासणी केली

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी दि.१४: नागरिकांच्या तक्रारी, रेमडीसीवेर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी व तुटवडा, रुग्णांच्या नातेवाईकांची मेडिकल स्टोअरवर होणारी अभूतपूर्व गर्दी या पार्श्वभूमीवर तहसीलदार प्रदिप पवार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी श्रीगोंदयातील सर्व मेडिकल स्टोअरची अचानक भेट देऊन तपासणी केली.

            श्रीगोंदा शहरात सध्या रोज १००-१५० च्या आसपास कोरोना रुग्ण संक्रमित होत आहेत. ग्रामीण रुग्णालय, कोविड केंद्र, खाजगी हॉस्पिटल रुग्णांनी खचाखच भरली आहेत. जीवनावश्यक गोष्टी सोडल्या तर ३० तारखेपर्यंत संचारबंदी लागू झाली आहे. ऑक्सिजन व रेमडीसीवेर इंजेक्शनचा भयंकर तुटवडा जाणवत आहे. श्रीगोंदा शहरातील फक्त तीन मेडिकल दुकानांना रेमडीसीवेर इंजेक्शन विक्री परवाना आहे. त्यामुळे या मेडिकल चालकांनाही पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त वाढल्याने प्रचंड दबाव सहन करावा लागत आहे. तरीही श्रीगोंदयातील मेडिकल सेवा देणारे चालक प्रचंड धावपळ करून इंजेक्शन उपलब्ध करण्याचा प्रयत्न करून कोविड उपचार मान्यताप्राप्त हॉस्पिटल व रुग्णांना देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. काही मेडिकल रात्री सुद्धा उघडे ठेवून सामाजिक बांधिलकी ठेवून रुग्णांना सेवा देत आहेत. यातूनच इंजेक्शन उपलब्ध नसल्याने बऱ्याच रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये अफवा व गैरसमज पसरत आहेत. अजूनतरी श्रीगोंदयात इंजेक्शनचा काळाबाजार दिसून आला नाही. इंजेक्शनचा तुटवडा व गैरसमजातून आलेल्या तक्रारींची दखल घेत तहसीलदार प्रदिप पवार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर व पथकाने शहरातील मेडिकल स्टोअरची अचानक तपासणी करून औषधांची आवक-जावक, परवाने, साठा पडताळणी यांची तपासणी केली. परंतु या पथकाला कुठलीही आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या नाहीत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News