माजी नगरसेवकाच्या शेतातील लिंबू चोरी


माजी नगरसेवकाच्या शेतातील लिंबू चोरी

श्रीगोंदा  अंकुश तुपे (प्रतिनिधी )सध्या लिंबू उत्पादन हे कमी असल्यांने आणि उन्हाळ्यात लिंबू मागणी वाढत असल्याने लिंबू किमान सत्तर  रुपये किलो पासून शंभर रुपये किलो विक्री होत असताना शहरातील औटीवाडी मधील सात एकर क्षेत्रावर असलेल्या लिंबू बागेतील लिंब अज्ञात वीस ते पंचवीस चोरट्यांनी रात्रीच्या सुमाराला एकाच वेळी लिंब झोडून चोरी करून नेले अंदाजे दहा ते बारा लाख रुपयांची चोरी झाली असल्याचे शेतकरी माजी नगरसेवक दादासाहेब औटी यांनी सांगितले 

शहरातील औटी वाडी तलावाच्या लगत असलेल्या सात एकर रात्रीच्या सुमारास माजी नगरसेवक दादासाहेब औटी तसेच त्यांचे बंधू प्रदीप औटी आणि अरुण औटी मेजर या तिघांच्या  लिंबू बाग  मधील लिंबू  चोरांनी  झाडे काठीने  झोडून लिंबू  चोरून नेले आहेत.याबाबत सकाळी शेतात गेल्यावर त्यांना हे लक्षात आले . औटी यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला येऊन याबाबत फिर्याद देणार असल्याचे सांगितले. तसेच  तालुक्यातील लिंबू व्यापारी यांच्याकडे जर  हिरवे लिंबू जास्त प्रमाणत विक्रीसाठी आले तर  श्रीगोंदा पोलीस स्टेशनला माहिती द्यावी असे माजी नगरसेवक दादासाहेब औटी यांनी सांगितले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News