डॉ. आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास क्रांती घडेल: हर्षवर्धन पाटील


डॉ. आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास क्रांती घडेल: हर्षवर्धन पाटील

भिगवण,(प्रतिनिधी) नानासाहेब मारकड 

प्रतिकुल परिस्थितीवर मात करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेतले व दिन दलितांच्या हक्कासाठी संघर्ष केला.शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास त्यांच्या जीवनांमध्ये क्रांती घडेल असे प्रतिपादन भाजप नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

येथील समता फांऊडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले. पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव, सरपंच तानाजी वायसे, बाबासाहेब शिंदे, अशोक शिंदे, अभिमन्यु खटके, तुषार क्षीरसागर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व, रांगोळी, नृत्य व चित्रकला स्पर्धांमध्ये २३२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. विजेत्या स्पर्धेकांना प्रथम पारितोषिक एक हजार, द्दितीय पारितोषिक सातशे रुपये व तृतीय पारितोषिक पाचशे रुपये व स्मृती चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. परिक्षक म्हणुन देवानंद शेलार, प्रा. शाम सातर्ले, योगेश चव्हाण, करण राऊत, स्नेहल गायकवाड, सतीश मोरे यांनी काम पाहिले.

प्रास्ताविक संजय देहाडे यांनी केले सुत्रसंचालन सुहास गलांडे यांनी केले तर आभार सत्यवान भोसले यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन नानासाहेब गायकवाड, प्रताप भोसले, अल्ताफ शेख, अमोल भोसले,योगेश भोसले, सागर देहाडे, धीरज गायकवाड, कृष्णा भोसले, रोहन देहाडे, गणेश भोसले आदींनी केले.

वक्तृत्व स्पर्धेतील विजेते ः गट क्रमांक एक ःप्रथम क्रमांक राजवर्धन संतोष काळे, द्दितीय क्रमांक गार्गी प्रशांत चवरे,तृतीय क्रमांक गौरी शाम सातर्ले, गट क्रमांक दोन ः प्रथम क्रमांक समृध्दी सतीश हगारे, द्दितीय क्रमांक श्रावणी राजेंद्र पवार, तृतीय क्रमांक इशिता रवींद्र गडकर व गट क्रमांक तीनः प्रथम क्रमांक रविंद्र विलास गडकर द्दितीय क्रमांक अनुश्री धनंजय चव्हाण तृतीय क्रमांक तेजस्वी सत्यवान भोसले, 

नृत्य स्पर्धेतील विजेते ः प्रथम क्रमांक गोपिका लतीश नायर द्दितीय क्रमांक धनश्री गजानन भोसले, तृतीय क्रमांक धनश्री धनंजय कानतोडे, 

चित्रकला स्पर्धेतील विजेतेः प्रथम क्रमांक अर्जुनसिंह नानासाहेब मारकड, द्दितीय क्रमांक नेहा उमेश पाचणकर, तृतीय क्रमांक आराध्य प्रदीप नेवसे, 

रांगोळी स्पर्धेतील विजेतेः  प्रथम क्रमांक शिल्पा संदीप जाधव, द्दितीय क्रमांक रेश्मा गडकर, तृतीय क्रमांक विशाल मोहन मोरे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News