कोरोनाग्रस्त रुग्णांसोबत वेदांता हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांनी केला गुढीपाडवा साजरा...


कोरोनाग्रस्त रुग्णांसोबत वेदांता हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांनी केला गुढीपाडवा साजरा...

कोरोनाग्रस्त रुग्णांना धीर देणं गरजेचे -डाॅ.आकाश सोमवंशी

शिरुर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे)

 कोरोना या संसर्गजन्य विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला असताना शिरुर येथील वेदांता क्रिटिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कोरोनाग्रस्त रुग्णांचे मनोबल वाढावे व त्यांना गुढीपाडवा या सणाचा आनंद साजरा करता यावा यासाठी वेदांता हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मिठाई वाटप करुन नववर्षाच्या शुभेच्छा देत गुढीपाडवा साजरा करण्यात आला.सद्यस्तितीत कोरोना आजाराला घाबरून न जाता आपण सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांना धीर देणं तितकेच गरजेचे असल्याचे मत यावेळी डाॅ.आकाश सोमवंशी व टीम वेदांताच्या  डाॅक्टरांनी व्यक्त केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News