काष्टीत चार बिबट्याचा धुमाकुळ तीन शेळ्या व कुत्रे फस्त ( चार दिवस झाले पिंजरा लावून उपयोग होईना )


काष्टीत चार बिबट्याचा धुमाकुळ तीन शेळ्या व कुत्रे फस्त ( चार दिवस झाले पिंजरा लावून उपयोग होईना )

(गवतेमळा) येथे ऊस शेतावर  लावलेला पिंजरा व दिसलेला बिबट्याश्रीगोंदा प्रतिनिधी अंकुश तुपे

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी (गवतेमळा) येथे गेली आठ दिवसापासून चार बिबट्यांनी तीन शेळ्या व तीन कुत्रे फस्त करित  धुमाकुळ घालून येथील नागरिकांना हैराण केल्यामुळे  या भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.यावर वन खात्याकडून चार दिवस झाले पिंजरा लावून सुद्धा  बिबट्या पिंजऱ्यात  येईना 

सविस्तर माहिती अशी कि काष्टी अजनुज रोडवर गवतेमाळा येथे गेली आठ दिवसापासून माणिकराव बापुराव गवते,सुनिल बाबासाहेब गवते, यांच्या तीन शेळ्या तर शंकर बुवासाहेब गवते यांचे एक व इतर दोन कुत्रे बिबट्याने खाल्ले आहे. यामुळे  बिबट्याची एक मादी व दोन पिल्ले परिसरात वावरताना येथील नागरिकांनी प्रत्यक्ष  पाहिले आहे.आणि  आज दि.१२ रोजी सकाळी ७ वाजता चार बिबट्याचे दर्शन नागरिकांना  झाले यामध्ये दोन पिल्ले व दोन मोठे बिंबटे आहे.याच घटनेची वन अधिकारी राजेंद्र भोगे यांना माहिती देवून त्यांनी आपले सहकारी वनपाल घालमे,गुंजाळ,बुराडे,लक्ष्मण लगड,मुराद तांबोळी यांना बरोबर घेऊन गवते यांच्या ऊसाच्या शेतात चार दिवसापासून  पिंजरा लावला आहे.तरी बिबटे  पिंजऱ्यात जाईना या भागात संपूर्ण  ऊसाचे क्षेत्र आहे.तर आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने घोडचे आवर्तन सुटले आहे.शेतीला पाणी देण्यासाठी अनेकांना शेतावर जावे लागते परंतु बिबट्याच्या भितीने लोक घराच्या बाहेर पडेना आता तर बिबट्या दिवसा लोक वस्ती मध्ये येथून येथील कुत्रे घेऊन जातोय यावर वन विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी शिवप्रसाद जगताप, बंडू गवते, चंद्रकांत गवते,डाॕ.बाळासाहेब पवार, अतुल गवते मुक्ता कोकाटे यांच्यासह नागरीकांची मागणी  आहे. 


जाहिरात
Search
विडिओ
Recent News