कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर कडक उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी रोटरी क्लबतर्फे मंडप व स्वयंसेवकाची सुविधा उपलब्ध


कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर  कडक उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी रोटरी क्लबतर्फे मंडप व स्वयंसेवकाची सुविधा उपलब्ध

- शेवगाव - ग्रामिण रूग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्रावर रोटरी क्लबतर्फे मंडप व स्वयंसेवकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे असे आवाहन शेवगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. किसनराव माने यांनी केले आहे.

रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीतर्फे  शहरातील ग्रामिण रूग्णालयातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर  कडक उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी गुढीपाडव्याला मंगळवारी ( दि. १३ )  मंडप व स्वयंसेवकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वेळी ते बोलत होते.  रोटरीचे माजी सहप्रांतपाल डॉ. संजय लड्डा यांच्या पुढाकारातून  स्वराज डेकोरेर्टरचे संचालक बबनराव म्हस्के यांनी मंडपाची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली आहे.

ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे, डॉ. संजय लड्डा, शेवगाव रोटरीचे अध्यक्ष प्रा. किसनराव माने, सचिव बाळासाहेब चौधरी, माजी अध्यक्ष भागनाथ काटे, बबनराव म्हस्के, मनेश बाहेती, दीपेश पीटेकर, महेश लाडणे, दीपक भापकर आदी उपस्थित होते.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना आधारकार्ड दाखवून व मोबाईल क्रमांकाची नोदं  संगणकावर करून नावनोंदणी करून लसीकरणाला पाठविले जाते.  रोटरीच्या स्वयंसेवकांनी मंगळवारी नाव नोंदणी व लसीकरणाबाबत नागरिकांना सहकार्य केले.  लसीकरण मोहिम सुरू असे पर्यंत रोटरीचे स्वयंसेवक नागरिकांना याकामी मदत करतील असे रोटरीचे अध्यक्ष प्रा. किसनराव माने यांनी सांगीतले.

- कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लस पुर्णतः सुरक्षित आहे.  ४५ वर्षांवरील जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. लसीकरणानंतरही नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे, वारंवार हात धुणे हे नियम पाळावेत. - डॉ. रामेश्वर काटे, वैद्यकिय अधीक्षक , ग्रामिण रूग्णालय.

--------------------

जाहिरात
Search
विडिओ
Recent News