दौंड तालुक्यात कोरोनाचे वन डे द्विशतक, कोरोनाचा कहर सुरूच,तब्बल 222 पॉझिटिव्ह


दौंड तालुक्यात कोरोनाचे वन डे द्विशतक, कोरोनाचा कहर सुरूच,तब्बल 222 पॉझिटिव्ह

विठ्ठल होले विशेष  प्रतिनिधी : ता.12

- दौंड तालुक्यात कोरोना ची परिस्थिती गंभीर होत चालली आहे याचा प्रत्यय आज दौंड शहरासह तालुक्‍यात तब्बल दोनशे बावीस रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत ही चिंतेची बाब आहे, आज दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे 551 जणांची अँंटीजन तपासणी करण्यात आली त्यामध्ये 110 पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये 81 पुरुष आणि 29 महिला यांचा समावेश आहे,SRF ग्रुप 5 आणि 7 जवान मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह आले आहेत हे सर्व रुग्ण दौंड शहरातील मध्यवर्ती ठिकाण आणि आजूबाजूच्या परिसरातील असल्याचे माहिती डॉक्टर संग्राम डांगे यांनी दिली, तर यवत स्वामी चिंचोली येथील सेंटरमधील 112 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी दिली आहे सुरेखा पोळ यांनी दिली आहे, आज दौंड शहरासह तालुक्यात एका दिवसात द्विशतक गाठले आहे, मागील वर्षी कोणाची नव्याने सुरुवात होत असताना देखील एवढी आकडेवारी आली नव्हती एवढी मोठी आकडेवारी  2021 मधील मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये दौंड तालुक्यात कोरोनाची झाली आहे त्यामुळे जनतेनेच संयम बाळगणे आणि नियमांचे पालन करणे गरजेचे झाले आहे, दौंड तालुक्यातील 35  गावांमधून आले आहेत त्यामध्ये यवत 22,आलेगाव 9, कुरकुम 9, खामगाव 8, कासुर्डी 3, खामगाव 2, देऊळगाव राजे 5, वाखारी 2, नांनगाव 2, केडगाव 5 कानगाव 2, पडवी 2, वरवंड 2, राहु 2, पडवी 2, लिंगाळी 4, या गावांमध्ये 112 रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी सांगितले आहे,एका दिवसात एवढी रुग्ण सापडणे ही खूप गांभीर्याची गोष्ट आहे आम्ही 24 तास तुमच्या बरोबर आहोत जनतेने संयम राखून शासनाच्या नियमांचे पालन करून आम्हाला सहकार्य करावे असे मत यावेळी डॉक्टर सुरेखा पोळ यांनी मांडले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News