दौंड शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( Aआंबेडकर गट) यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


दौंड शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( Aआंबेडकर गट) यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

दौंड शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( Aआंबेडकर गट) यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, १०० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवाला दिली मानवंदना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य एक आदर्श-पोलीस निरीक्षक सचिन पाटील

सुरेश बागल दौंड :प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त मेमोरियल हॉस्पिटल दौंड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Aआंबेडकर गट) यांच्या वतीने करण्यात आले होते, या शिबिराचे उद्घाटन दौंड पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी सचिन पाटील म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य एक आदर्श निर्माण करून गेले आहे, यावेळी न्यूज-२४ दौंड तालुका प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर यांनी पंचावन्न वेळा रक्तदान करून एक आदर्श निर्माण केल्याने दौंड पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, या रक्तदान शिबिरांमध्ये १०० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवाला मानवंदना दिली, या कार्यक्रमाचे आयोजन सचिन खरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A आंबेडकर गट)दौंड तालुका अध्यक्ष, प्रवीण धर्माधिकारी शंशाक गायकवाड,रामभाऊ देवडे,पृथ्वी खंडाळे,पत्रकार सुरेश बागल, यांनी केले होते.रक्तदान न करता  आपली उपस्थिती दाखवण्याचे काम वरिष्ठ पत्रकार विठ्ठलराव शिपलकर यांनी केले. कार्यक्रम सोशल डिस्टनसींग पाळून करण्यात आला होता.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News