जालियनवाला बाग नरसंहाराच्या 102 व्या स्मृतीदिनानिमित्त फिल्म्स डिव्हिजन करणार लघुपटांचे प्रसारण


जालियनवाला बाग नरसंहाराच्या 102 व्या  स्मृतीदिनानिमित्त फिल्म्स डिव्हिजन करणार लघुपटांचे  प्रसारण

दिनांक 13 एप्रिल 2021 रोजीजालियनवाला बाग हत्याकांडाच्या 102 व्या स्मृतीदिनानिमित्तफिल्म्स डिव्हिजनया हत्याकांडातील  हुतात्म्यांना  श्रद्धांजली म्हणून तीन माहितीपर  लघुपट दाखवणार आहे.  हे चित्रपट आहेतः जालियन वाला बाग  हा लघुचित्रपट (18 मिनिटे / प्रेम प्रकाश / इंग्रजी / 1970 ),  हा  नरसंहार भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासामध्ये एक निर्णायक टप्पा   कसा ठरला ते दाखवितो, "जालियनवाला बाग चे  नायक - डॉ. सैफुद्दीन किचलू" ,(27 मिनिटे / एस. आझाद) / हिंदी / 2011), हा  जालियनवाला बाग येथील सभेचे आयोजक  डॉ. सैफुद्दीन किचलू यांच्या  चरीत्रावर आधारीत  लघुपटडॉ. एस किचलू आणि  "13 04 1919" (12, मिनिटे/ अमृत पाल सिंह / हिंदी / 2019) हा  ब्रिटिश सैन्याने जालीयनवाला बाग येथे   निष्पाप  लोकांच्या केलेल्या भयानक नरसंहारावर   आणि या हत्याकांडाच्या दुदैवी  प्रसंगाच्या स्मरणार्थ बांधल्या गेलेल्यास्मारकावर आधारीत लघुपट .दिनांक 13 एप्रिल 2021 रोजी https://filmsdivision.org/  @ डॉक्यूमेंटरी ऑफ द वीक आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision  या संकेतस्थळांवर  24 तास हे  लघुपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News