रेमडेसिवीर न मिळाल्याने नागरिक संतप्त ; केडगावमध्ये नागरिकांचा ठिय्या


रेमडेसिवीर न मिळाल्याने नागरिक संतप्त ; केडगावमध्ये नागरिकांचा ठिय्या

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) कोरोनाचा वाढत प्रसार पाहता अहमदनगर जिल्ह्यात प्रशासन विविध सुविधा करत आहे. परंतु रेमडेसिवीर हे इंजेक्शन मात्र अद्यापही मिळत नसल्याचे वास्तव आहे. अनेक ठिकाणी कोरोना पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. आता हे औषध मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईंकांनी आता आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. अनेक ठिकाणी फिरूनही औषध न मिळाल्याने केडगाव येथे नागरिकांनी नगर-पुणे महामार्गावरच ठिय्या दिला.


त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. रविवारी शहरात अनेक ठिकाणी फिरून औषध मिळाले नाही. केडगावमधील एका औषध दुकानात हे औषध उपलब्ध असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. त्यामुळे अनेकांनी तेथे धाव घेतली. मात्र, तेथे अपुरा साठा होता. अनेकांना औषध मिळाले नाही. नवीन साठा येत असल्याचे सांगण्यात आले परंतु कालपासून वाट पाहूनही काही प्रतिसाद नसल्याने नातेवाईंकानी अखेर रस्त्यावर ठिय्या दिला. या ठिकाणी काही नागरिकांकडून या दुकानातून चढ्या भावाने विक्री करत असल्याचा असेच ठराविक लोकांनाच इंजेक्‍शन दिले जात असल्याचाही आरोप केला. 

 याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात माहिती मिळताच कोतवाली पोलीस  स उ नि. भंगाळे सतिश शिरसाठ व कर्मचारी केडगाव येथे जाऊन नागरिकांना काना सुचना देऊन या मेडिकला कोतवाली पोलीस ठाण्यात बोलवुन घेतलेे होते. यावेळी मेडिकल दुकाने चालक मोठ्यानी उपस्थित होते. यावेळी राजकीय पक्षाचे  कार्यकर्ते उपस्थित होते. यााबाब कोतवाली पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत मेडिकल दुकानाचे  मालक चौकशी केली आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News