म्हसे गावची ऋतुजा देवीकर महाराष्ट्रात पहिली


म्हसे गावची ऋतुजा देवीकर महाराष्ट्रात पहिली

श्रीगोंदा : प्रतिनिधी अंकुश तुपे :

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती निमित्त आयोजित शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान कुंभार पिंपळगाव विभाग यांच्या द्वारे जागरण हिंदुत्वाचा युट्युब चॅयनल यांनी महाराष्ट्र ऑनलाईन महावक्ता-2021स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील हजारो स्पर्धेक सहभागी झाले होते. या ऑनलाइन भाषण स्पर्धेत म्हसे गावची कन्या कु. ऋतुजा संपत देवीकर हिने महाराष्ट्रात लहान गटात प्रथम क्रमांक मिळवला.ग्रामिण भागातील ऋतुजा वडील संपतराव यांच्या मार्गदर्शनाने राज्यस्तरावर झळकली.सामान्य कुटुंबातली ऋतुजाचे वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार होऊन कौतुक होते. येळपणे गावात आझाद हिंद युवा ग्रुपच्या वतीने प्रा.सांगळे सर आणि मित्र परिवाराच्या वतीने तिचा नेटकाच कौतुक सोहळा संपन्न झाला. म्हसे गावच्या वतीने ही तिचा सत्कार करण्यात आला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News